
वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश..
——————
प्रतिनिधी :
—————–
प्रचंड मेहनत व अभ्यासातील सातत्याने हयातनगर येथील संस्कृती सारंग हिने वैद्यकीय प्रवेश पुर्व परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालत वाशीम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला आहे.
वसमत तालुक्यातील हयातनगर येथील संस्कृती सावता सारंग हिचे शालेय शिक्षण व मत येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. वैद्यकीय क्षेत्रात करीअर करायचे असा ठाम निर्णय घेत परीश्रम घ्यायला सुरुवात केली. त्यातच संस्कृतीचे आई-वडील दोघेही व्यावसायाने शिक्षक असल्याने त्यांनी संस्कृतीला अभ्यासाबाबत नेहमीच मार्गदर्शन केले. योग्य नियोजन व अभ्यासातील सातत्याने अखेर वैद्यकीय प्रवेश पुर्व परीक्षेच्या (नीट) परीक्षेत ७२० पैकी ५०७ मार्क मिळवीत घवघवीत यश मिळवले. त्यामुळे संस्क.तीला गुणवत्तेच्या पहिल्याच यादीत वाशीम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला. तसेच सारंग कुटूंबातील पहिलीच मुलगी डॉक्टर होण्याचा मान देखील संस्कृतीने मिळवला. या यशाबद्दल संस्कृती सावता सारंग यांचे व पालकांचे सर्वंच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
अवघड विषयाचा अधिक अभ्यास केला
वैद्यकीय प्रवेश पुर्व परीक्षेची तयारी करत असताना अवघड वीषयाला जास्त वेळ देत अधिक सराव केला. तसैच आई-वडीलांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरले. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास यश हमखास मिळते.
संस्कृती सावता सारंग (विद्यार्थ्यांनी)
