
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग, सिख, सिकलगर, बंजारा, लंबाना मोहियल, सिंधी समाजबांधवांचे एकत्रित आयोजन…
——————-
वसमत :
——————-
महाराष्ट्र शासनातर्फे ‘हिंद की चादर’ गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहीदी शताब्दीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने समिती गठीत करुन अशासकी सदस्यांची निवड केली जात आहे. या समितीच्या सहसचिव पदी वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हरनामसिंग चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहादत व त्यागाला आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रम, जसे की नगर कीर्तन, कथा आणि किर्तन, यांच नियोजन करण्यासाठी अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे. या साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन मीटिंग घेण्यात आली . यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सदस्य या बैठकीसाठी उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्याबरोबरच नांदेडसह नागपुर , मुंबई येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले असून देश विदेशातील समाजबांधव कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. असल्याची माहिती हरनामसिंग चव्हाण यांनी दिली.
श्री गुरु तेग बहादुर यांचे सन-२०२५ हे ३५० वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहित व्हावा, तसेच त्यांनी केलेला प्रचार व दिलेले बलिदान याचे स्मरण होण्याकरीता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहीदी समागम शताब्दी तसेच गुरु गोविंदसिंग, गुरु-ता-गद्दी समागम समिती यांनी मा. मुख्यमंत्री यांना विनंती केली. कार्यक्रमचे आयोजन सिख, सिकलगर, बंजारा, लबांना,मोहियल, सिंधी समाज बांधव एकत्रित पणे करीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ातील अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये हिंगोली जिल्ह्यामधून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार हरनामसिंग चव्हाण यांची समितीच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
श्री गुरु तेग बहादूर यांचा शौर्य इतिहास….
श्री गुरु तेग बहादुर हे शिख धर्माचे ९ वे गुरू होते, त्यांना हिंद-की-चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादुर यांनी शिख धर्मात प्रार्थना, परोपकार, सेवा, साधेपणा, इतरांच्या सेवेला महत्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केला, त्यांचे प्रवचन व भजन यांचा “गुरु ग्रंथ साहिब” यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेग बहादुर यांनी १७ व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवून धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शिख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली. मुघल सम्राटांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी नववे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिला या बाबीस भारतीय इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे.
