
रस्त्ता व चौकाचौकातील अतिक्रमणाने वाढला धोका, लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे मोठे अपयश…
शिव सकाळ न्यूज
वसमत : ता.४ : भरधाव हायवा डंपरने शनिवार ता.३ शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकात वाहनांसह लोकांना अक्षरशः चिरडले. या अपघातात नाहक दोघांचा बळी गेला तर दोन छोटे मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुपारची उन्हाची तीवृता अधिक असल्याने लोकांची वर्दळ कमी होती त्यामुळे सुदैवाने मोठी जिवितहानी टळली. या ‘हीट अँन्ड रन’ च्या थराराने वसमत शहरातील बाजारपेठेतील रस्ते, मुख्य रस्ते व चौका चौकातील रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. पाच. सहा महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची मोठी घटना शहरातील मुख्य चौकात घडली होती. या घटनेत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने काही बोध घेऊन उपाययोजना केल्या असत्या तर शनिवारची घटना घडली नसती.
वसमत हे उद्योग, व्यावसाय, कारखानदारी, शैक्षणिक संस्था आणि शेतीमालाची मोठी बाजारपेठ असल्याने तसेच हिंगोली,परभणी नांदेड जिल्ह्याला जोडणारे शहर असल्याने येथे नागरीक, प्रवाशांची मोठी वर्दळ असते. नेहमीच गजबजलेले असलेल्या शहराला मात्र अतिक्रमणाच्या विळख्याने घेरले आहे. अतिक्रमणे मुक्त रस्ते, चौक झाल्यास व अवैध वाहतूक, अवैध व्यावसायावर आळा घातल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. यासाठी नगर परिषद प्रशासन, पोलिस प्रशासन, प्रादेशिक परिवहन प्रशासन व महसुल प्रशासनाने तत्परता दाखवायला हवी. त्याबरोबरच लोकप्रतिनिधीनी प्रशिसनावर दबाव टाकुन नागरीकांना धोकादायक बणलेलले प्रश्न सोडवायला पाहिजे. शनिवारी शहरातील कौठा रोडवरील मुख्य रस्त्यावरील मदिना चौकात, क्षमतेपेक्षा जास्त माती वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील हायवा डंपरने रस्त्याच्या बाजूला असलेल्या अँटोसह महिला मुलांना चिरडले. यात एक महिला व १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर मृत महिलेचे दोन मुलं गंभीर जखमी झाले. सुदैवाने उन्हाच्या तिवृतेमूळे रस्त्यावर माणसं नव्हती तसेच अँटोत प्रवाशी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परंतू प्रशासनाने वेळीच अवैध गौण खनिज वाहतूकीवर आळा घातला असता आणि रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा केला असता तर कदाचित या घटनेत मनुष्यहानी झाली नसती. प्रशासन व लोकप्रतिनिधीनी याबाबींकडे गांभिर्याने लक्ष देऊन माणसासाठी धोकादायक बनलेले प्रश्न सोडवावेत अशी मागणी नागरीकाकडून केली जात आहे.
आरटीओ कडून अपेक्षा.. केवळ गुन्ह्यातील वाहणाची चौकशी करुन दंड लावणारा प्रादेशिक परिवहन विभागाकडून घटना घडू नये म्हणून अवैध वाहतूक करणार्या वाहनांवर यापुढील काळात तरी कारवाई होईल का याकडे नागरीकाकांचे लक्ष लागले आहे.
