मातोश्री सविता ताई बाहेती यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे केले आवाहन…
——————-
प्रतिनिधी :
——————-
पद, प्रतिष्ठेसाठी कधीच भूकेला नसलेल्या तसेच मागील दशकांपासून गोरगरीब नागरीकांच्या हाकेला ओ देऊन पाठिशी वाटेल ती मदत उभी करणार्या कन्हैया भैय्याने आगामी पाच वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासह जात-धर्म , गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता ‘आपला माणूस’ म्हणून सर्वांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचा शब्द दिला आहे. मतदार बंधू-भगिनींनी मातोश्री सुनिता ताई बाहेती यांना प्रचंड विजयी करुन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

वसमत शहरात कोणतेही राजकीय पद नसताना कन्हैया भैय्या बाहेती यांनी पदरमोड करीत कमी वयात सामाजिक कार्याचा पाया रचला. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींना लाजवेल असे काम मागील दशकात त्यांनी उभे केले आहे. प्रतिष्ठा, पैसा यांची हाव नसलेल्या कन्हैया भैय्या यांनी कमी वयात विविध लोककल्याणकारी कामे केली आहेत. यामध्ये विद्यार्थी, नागरीकांना शासकीय कागदपत्रांची मदत, गरजूंना वैद्यकीय आर्थिक व उपचारासाठी मदत, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी वेळोवेळी रक्तदान शिबीरे तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन, विविध सामाजिक उपक्रमातून तरुणांना मार्गदर्शन, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करीत रोजगाराच्या संध्या मिळवून दिल्या, कोरोना काळात जेंव्हा रक्ताचे नाते आंतर ठेवत असताना कन्हैया भैय्याने मात्र जिवाची पर्वा न करता पॉझिटिव आलेल्या रुग्णांसाठी अन्नधान्य, जिनावश्यक वस्तू तसेच औषधी व उपचार मिळवून दिले. वसमत शहरात रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी शहरात पहिली रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. यासोबतच विवाह सोहळे घेऊन विविध समाजातील गोरगरीब मुलामुलिंचे विवाह लावून देत त्यांचे संसार फुलविण्याचे काम केले.
विशेष म्हणजे कोणतेही पद नसताना, कोणताही निधी नसताना लोकसेवेसाठी चोवीस तास उपलब्ध असलेल्या कन्हैया भैय्या यांनी नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या आपल्या मातोश्री सुनिता ताई बाहेती यांना प्रचंड मतांनी विजयी करुन आगामी काळात विविध विकासकामांच्या रुपाने सेवा करण्याची सविंधानिक सधी द्यावी असे आवाहन केले आहे. केवळ विकास कामच नाही तर आपला माणूस म्हणून प्रत्येकाची सर्वांगीण काळजी घेण्याचे बळ आपल्या अमूल्य मतांमधून मिळवून द्यावे असे आवाहन कन्हैया भैय्या यांनी केले आहे.


