हु बहिर्जी स्मारक महाविद्यालयात ‘भारतीय लोकशाही पुढील आव्हाने आणि भारतीय संविधान’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र…
——————-
प्रतिनिधी :
——————
लोकशाहीच्या सर्व संस्था उध्वस्तीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू असून सदरील संकट आणून पाडण्यासाठी बुद्धिवाद्यांनी व संशोधकांनी आता जागर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बँकॉक (थायलंड) येथील सुहान सुनंदा राजा भट विद्यापीठाचे डॉ श्रीरंजन आवटे यांनी केले. ते चर्चासत्राच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात बीजभाषक म्हणून बोलत होते.
येथील हु बहिर्जी स्मारक महाविद्यालयात दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते करण्यात आले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार पंडितराव देशमुख, डॉ श्रीरंजन आवटे, प्राचार्य मा. मा. जाधव यांची उपस्थिती होती.
चर्चासत्राला बीजभाषक म्हणून भारतीय लोकशाही पुढील आव्हाने भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ श्रीरंजन आवटे पुढे म्हणाले की, ज्या मूल्यावर हा देश उभा आहे ते संविधान मूल्यांचे आपण जोपर्यंत जागरण करीत नाहीत तोपर्यंत गणराज्य अस्तित्वात येणार नाही आणि ज्या मूल्यावर हा देश उभा आहे ते संविधान मूल्याचे आपण जोपर्यंत जागरण करत नाहीत तोपर्यंत गणराज्य अस्तित्वात येणार नाही असे ते म्हणाले.तसेच भारतीय संविधानिक नैतिकता भारतीयांनी पाळली नाही हा ऐतिहासिक अपराध बुद्धिवदानी करू नये असे त्यांनी आवाहन केले. संविधान बाबत बोलताना ते म्हणाले की, सामाजिक भेदभाव हा आर्थिक असू शकत नाही विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो याची ख़त व्यक्त करीत २०२२-२४ मध्ये असलेले सरकार संविधानातील होते का असा प्रश्नही त्यांनी केला. सुप्रीम कोर्टाचे सन्माननीय न्यायमूर्ती सांगतात भारतीय लोकशाही संकटात आहे. सेक्युलर डेमोक्रसी आज धोक्यात आली असल्याचे ते म्हणाले. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी अध्यक्षीय समारोप करताना बहिर्जी महाविद्यालयाच्या सर्व टीमचे कौतुक केले. तत्पूर्वी प्राचार्य मा या जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉक्टर शारदा कदम यांनी केले. तर आभार मराठी विभाग प्रमुख डॉक्टर बाबुराव खंदारे यांनी मांडले या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी 250 संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले होते.


