मास्टर कृष्णा देवणे यांच्या आत्मरक्षा अँन्ड आँल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशन चा उपक्रम…
——————–
प्रतिनिधी :
——————-
येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या प्रांगणात मास्टर कृष्णा देवणे यांचे आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसह महिलांसाठी लाठीकाठी स्टिक कराटे शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला महिला मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रशिक्षण घेतले.

महिला मुलीवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना घडू नये तसेच महिला व मुलींना स्वतःचे आत्मसंरक्षण करता यावे यासाठी मागील काही वर्षापासून मास्टर कृष्णा देवणे यांच्यासह शंतनु सूर्यवंशी विनायक रोडगे चैतन्य गव्हाणे साईनाथ राऊत प्रणव तोष्णीवाल दीक्षित माळे उत्कर्ष कदम रागिनी सोनवणे भूमिका पेंढारकर यांनी कराटे क्लासेसच्या माध्यमातून मुलींना प्रशिक्षित करण्याचे काम सुरू केलेले आहे.
विशेष म्हणजे यावर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसह महिलांनाही लाठीकाठी स्टिक चालवता यावी यासाठी दहा दिवशी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने मुलींसह महिलांनीही सहभाग नोंदवला होता. या कार्यकाळात महिलांनी उत्तमरीत्या प्रशिक्षण घेत गाठी चालवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमासाठी अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरिता पतंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून वैशालीताई तोष्णीवाल, आम्रपाली ताई साळवे, अपूर्वा चौकडा, नेहा गायकवाड यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन स्वरा भोसले , जयश्री कोचार सिद्धी सारंगयांनी केले. तर आभार मास्टर चैतन्य गव्हाणे मास्टर साईनाथ राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मास्टर दीक्षित माळे भूमिका पेंढारकर रागिनी सोनवणे उत्कर्ष कदम सिद्धी सारंग साईनाथ राऊत प्रणव तोष्णीवाल सार्थक किरगे कन्हैया जाधव स्वरा भोसले जयश्री पोचार रिया वरवंटे हेतल स्वामी आदीनी पुढाकार घेतला.


