
समाजकार्य, समाजहिताची तळमळ , सामाजिक बांधिलकी आदी उल्लेखनीय कार्याची घेतली दखल…
——————–
प्रतिनिधी :
——————–
हिंगोली, नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील वीरशैव लिंगायत समाज हिताचे कार्य असलेल्या रामदास पाटील सुमठानकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे या संस्थेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री सुमठानकर यांना अध्यक्ष प्रा रमेश आवटे यांनी नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले आहे.
सन १९७८ मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रसिद्ध उद्योजक स्व.निळकंठ सेठ कल्याणी, नामदेव सेठ रुकारी यांच्यासह अनेक महात्म्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी एकत्र येऊन पुणे येथे महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा ची स्थापना केली. या सामाजिक संस्थेवर रामदास पाटील सुमठानकर यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रा रमेश आवटे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर होनराव यांच्या स्वाक्षरीचे नियुक्ती पत्र नुकतेच श्री सुमठानकर यांना देण्यात आले आहे. या नियुक्ती बाबत वीरशैव लिंगायत समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
श्री सुमठानकर यांची आगामी भुमिका…
रामदास पाटील सुमठानकर यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी समाजाच्या समर्पित कार्यकर्त्याला ही संधी मिळाली असून आगामी काळात सभेचे पुनर्जिवन करणे, ग्रामपातळीवर शाखा स्थापन करुन समाज संघटीत करणे तसेच समाजाच्या महामंडळाचा विषय, स्मारकाचा विषय, जिल्हास्तरीय वसतिगृह, रुद्रभूमी मुक्ती मोहिम, समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र अशा अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात अग्रगण्य भूमिका ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नियुक्तीबद्दल त्यांनी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेचे अध्यक्ष प्रा रमेश आवटे, सरचिटणीस चंद्रशेखर होनराव,वसंतराव नगरकर, श्री झपके, सुरेंद्र गाढवे, सर्व कार्यकारी मंडळ तसेच प्रांतिक सदस्य, युवा विंग, महिला विंग आदींचे आभार मानले आहेत.
