
- वसमत, दि.३० (प्रतिनिधी) : वसमत शहरात बुधवार दि.३० जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती ठिकठिकाणी जल्लोषात साजरी करण्यात आली. पाटील नगर येथून निघालेल्या शोभायात्रेत हजारो लिंगायत समाजबांधवासह इतर सर्व समाजबांधवांनी सहभाग घेत जल्लोष केला. महात्मा बसवेश्वर या़चा जिवंत देखावा, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व अखंड भारत दर्शवणारा देखाव्याने शहरवासीयांचे लक्ष वेधले. यावेळी ठिकठिकाणी विविध पक्षांचे राजकीय प्रतिनिधी, विविध समाजाचे प्रतिनिधी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच शोभायात्रेवर फुलांची उधळण करीत स्वागत केले.
सकाळपासून विविध समाज संघटना, प्रशासकीय कार्यालये धार्मिक संस्थान येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. सिध्देश्वर मंदिर लासीन मठ येथे गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच थोरला मठ येथे गुरुवर्य वेदांतचार्य डिगांबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. याबरोबरच वीरशैव तेलीमठ अपरंपार स्वामी संस्थान येथे जयंती साजरी करण्यात आली. शिवा संघटना, एसटी आगार यांच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. यासह शहरातील प्रशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, निमशासकीय कार्यालये येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधिर वाघ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
दुपारनंतर उन्हाची तिवृता कमी झाल्यानंतर शहरातील पाटील नगर येथून महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. हातात भगवे झेंडे घेऊन सहभागी तरुणांई महात्मा बसवेश्वर महाराज, मन्मथ स्वामी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या नावाचा जयघोष करीत डिजेच्या तालावर थिरकली
