
पांढरा शिंदे येथे हेरिटेज दूध उत्पादक शेतकरी मेळावा संपन्न...
———————
प्रतिनिधी :
———————-
हिंगोली जिल्ह्यात दररोज ३० हजार लिटर पेक्षा जास्त दूध बाहेर जिल्ह्यातून येत असल्याने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांने सामूहिक प्रयत्न करून जिल्हा हा दुधात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच दूध निर्यातदार जिल्हा म्हणून ओळख मिळवून द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता.१३ वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे पार पडलेल्या हेरिटेज दूध उत्पादक शेतकरी मेळाव्यात केले.
पांगरा शिंदे येथील रोकडेश्वर मंगल कार्यालयात बुधवारी हेरिटेज दूध उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, दररोज जिल्ह्यात तीस हजार पेक्षा जास्त लिटर दूध बाहेरून येते. परिणामी त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जनावरे पाळून दुग्ध व्यवसायाकडे वळावे, दूध उत्पादन वाढीसाठी सामूहिक प्रयत्न करावा. शासन योजनेचा लाभ घेऊन हे दूध उत्पादन वाढवावे, तसेच बँकांनी देखील दूध उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा शिवाय पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना दूध उत्पादनाच्या कामात आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश दिले. अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक सुजीत झोडगे यांनी देखील यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आपण सर्व बँकांना आवश्यकता सूचना दिले असून शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी बँका मदत करण्यास तयार आहेत. अशी माहिती दिली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त शिवाजीराव खुणे यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी दुधाची कमतरता लक्षात घेऊन हे उत्पादन त्रुटी भरून काढावी. त्यासाठी जनावरांना सकस आहार, संतुलित आहार देऊन हिरवा व वाळला कडबा याचा चारा देऊन दूध उत्पादन वाढवावे. हिंगोली येथील वळु उत्पादक क्षेत्र येथून जनावरांसाठी लागणाऱ्या कार्याकरिता कंदमुळे आणावेत, ठोंबे आणून आपल्या शेतात लावावीत तसेच चारा उत्पादन वाढवावे. शिवाय जनावरांची प्रजनन क्षमता कशी वाढेल तसेच दूध उत्पादन क्षमता कशी वाढेल याबाबत विचार करून प्रयत्न करावेत असे म्हणाले. लोन देताना बँकांनी सिबिल पूर्ण बघता शेतकऱ्यांना लोन पुरवठा करण्याच आव्हान वसमत तहसीलदार शारदा दळवी यांनी केले . पांगरा शिंदे येथे घेण्यात आलेल्या हेरिटेज दूध उत्पादक शेतकरी मेळाव्याला प्रमुख जिल्हाधिकारी राहुल गुप्ता , सखाराम खूणे (जिल्हा पशुसवंर्धन उपयुक्त हिंगोली) ,श्रीमती शारदा दळवी (तहसीलदार वसमत), शिवाजी व्यंकटराव गिनगिने (शाकीय डेरी मिल्क ऑपिसर परभणी/हिंगोली,) सुजीत झोड़गे (व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक),शालिकराम जाधव, (व्यस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा वसमत ) डॉ .माधव साखरे (पशु धन विकास अधिकारी कळमनूरी मुख्यमंत्री स्वस्थ योजना), रामदास निरगुडे,(साह्यक पोलिस निरीक्षक कुरुंदा)सौ.पूनम गजानन शिंदे (सरपंच पांगरा शिंदे) तानाजी शिंदे संचालक (दत्तगुरु फार्मर प्रोड्यूसर कंपनी ) गंगाधर श्रंगारे (शेती निष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त),राममोहनराव सागी (हेड पी &आय हेरिटेज फूड्स लिमिटेड़) डॉ. दुर्योदन जगदाळे (झोनल हेड हेरिटेज फूड्स ली महाराष्ट्र),डॉ. प्रेमांशु सौरव (रीजनल हेड मराठवाडा&विदर्भ हेरिटेज फूड्स लिमिटेड),डॉ अमर जाधव (पशु अधिकारी हेरीटेज फूड्स लिमिटेड ), व्हि के सिंन्हा (प्लांट इंचार्ज वारंगा हेरिटेज फूड्स लिटेड) ,एस .ए. जाधव( प्लांट इंचार्ज मार्डी हेरिटेज फूड्स लिटेड),
यांच्या सह जिल्ह्यातिल दूध उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिति होती . सूत्र संचालन विलास शिंदे यांनी केले तर आभार रमेश चेंडके यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर वानखेडे साईनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले.
