नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला, रॅली व फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोष, नवनिर्वाचित नगरसेवकांची तसेच कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती…
——————–
प्रतिनिधी :
——————–
नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट जनतेमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षा सुनिता ताई बाहेती यांनी सोमवार ता.२९ आयोजित सोहळ्यात नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (दादा) उमेदवार सुनिता ताई मनमोहन बाहेती ह्या २० हजार पेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. आमदार राजू भैया नवघरे यांची साथ व त्यांचे चिरंजीव कन्हैया बाहेती यांचे मागील दशकातील केलेले विविध सामाजिक कार्य तसेच सुख-दुखात केलेली मदत फळाला आली.

सोमवारी नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार आमदार राजू भैया नवघरे यांच्यात निवासस्थानासमोर नगराध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. आमदार नवघरे यांच्या मार्गदर्शनानंतर निवासस्थान ते नगर परीषद कार्यालय पर्यंत वाजत गाजत रॅली काढण्यात आली. यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात मुख्याधिकारी श्री मुंढे यांनी सुनिता ताई बाहेती यांना पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षपदाची सुत्रे हाती दिली. यावेळी गगनचुंबी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार राजू भैया नवघरे, मनमोहन बाहेती, कन्हैया बाहेती तसेच नवनिर्वाचित नगरसेवक, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.
नगराध्यक्ष पदाचे सुत्रे हाती घेतल्यानंतर सुनिता ताई बाहेती यांनी मनोगत व्यक्त करताना मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवतानाच विविध विकास कामांचे दिलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आमदार राजू भैया नवघरे यांच्या सहकार्याने शहरांचा सर्वांगीण विकास करताना स्वच्छ शहर व सुंदर शहर ही संकल्पना राबवून शहराचा कायापालट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदग्रहण सोहळ्याला सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती होती तसेच पक्षीय कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी कार्यालयीन अधिक्षक डी. जी. दळवी, महेश बिरादार, नितीन चव्हाण, बालाजी सोनवणे, अफसाना मुजावर, साक्षी भोसले, स्नेहा घनसावंत, सुभाष निरावार, ज्ञानेश्वर जाधव, अरविंद शिकारी, नवाज कुरेशी, रमन सुतारे, प्रविण दहीवाळ, भुजंग भिसे व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. सूत्र संचलन आनंद बडवणे यांनी केले तर आभार मुख्याधिकारी यांनी आभार मानले.


