
नारायणा शाळेच्या राज्यातील एकुण ४० शाळेमधून पहिला तर देशातील ८०० शाळेमधून दुसरा क्रमांक…
वसमत :
नांदेड येथील विद्यार्थी युवराज नितीन नायक याने सी बी एस ई बोर्डाच्या इयत्ता १० वी च्या परीक्षेत सर्वोत्तम यश संपादन करत 500 पैकी 497 गुण म्हणजेच 99.40% गुण मिळवून त्याच्या ‘नारायणा शाळे’च्या महाराष्ट्र प्रदेश स्तरावरील एकूण 40 शाळेमधून “पहिला” येण्याचा तर अखिल भारतीय स्तरावरील एकूण 800 शाळेमधून “दुसरा” येण्याचा गौरवशाली मान मिळविला आहे. युवराज नायक हा वसमत येथील सहाय्यक सरकारी वकील अँड नितीन नायक यांचा मुलगा आहे.
युवराजने त्याचे लक्षणीय यश हे त्याची अभ्यासू व एकाग्रचित वृत्तीचे तसेच आजी – आजोबा सौ. जिजाबाई व श्री हनुमंतराव नायक ; आई – वडील सौ. ऊर्मिला व अँड. नितीन नायक तसेच शाळेच्या प्राचार्या श्रीमती शशिकला मॅडम व शिक्षकवृंद यांच्या प्रयत्नांचे फळ असल्याचे सांगितले आहे.
युवराज च्या या अभुतपुर्व यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
