
२९ जुलै २०२४ आँनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख, इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत – प्राचार्य
——————–
प्रतिनिधी :
——————–
येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६/२७ मध्ये इयत्ता सहावीच्या वर्गात प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे .
या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती प्राचार्य एस.जे. गवई यांनी दिली .
या परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातील शासनमान्य शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५/२६ मध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारे सर्व विद्यार्थी अर्ज भरण्यास पात्र आहेत. अर्ज भरणारा विद्यार्थी हिंगोली जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक असून त्यांनी खालील संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत. https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration
अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०२५ ही असून विद्यार्थ्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
पालकांनी अधिक माहितीसाठी आपला विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी अथवा प्रत्येक तालुका ठिकाणच्या गटशिक्षण अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालया मार्फत संचलित जवाहर नवोदय विद्यालय ही एक उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था असून या विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण भोजन व इतर सर्व शैक्षणिक साहित्य आणि निवासाची मोफत सोय आहे. हिंगोली जिल्ह्यातील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अर्ज भरावा असे आवाहन प्राचार्य एस जे गवई यांनी केले आहे.
