अडचणी आल्यास संबंधित कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा…
——————
प्रतिनिधी :
——————
ऊस तोडणी करताना तोडणी मजूर , मुकादम व कंत्राटदार यांच्याकडून करण्यात येणाऱ्या अनुचित मागण्यांना ऊस उत्पादक शेतक-यांनी बळी पडू नये. असा प्रकार समोर आल्यास संबंधित कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन नांदेड येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) विश्वास देशमुख यांनी केले आहे.
राज्यात चालू २०२५-२६ गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारण १४५ ते १५० दिवसात गाळप होईल एवढी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढली असल्याने शेतकऱ्यानी आपला ऊस गाळप होईल की नाही याबाबत शंका घेऊन ऊस लवकर गाळपास जावा याकरिता अनुचित मार्गाचा अवलंब करु नये. ऊस पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे. तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याकडून रोख पैशाची व अन्य वस्तू , सेवांची मागणी केली जाते, अशा अनुचित मागण्यांना त्यांनी बळी पडू नये. तसेच याबाबत काही तक्रार असल्यास कारखान्याचे खालील तक्रार निर्धारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. डोंगरकडा, ता. कळमनुरी (शेतकी अधिकारी एल. टी. पुयड मो. ९५५२५८७३६४), पुर्णा सहकारी साखर कारखाना लि., वसमतनगर ता. वसमतनगर (जनसंपर्क अधिकारी आर. पी. गुंडाळे मो. ९४२१३८१३१४), कपीश्वर शुगर अँन्ड केमिकल लि., जवळाबाजार ता. औंढा नागनाथ (मुख्य शेतकी अधिकारी आर. एस. देशमुख मो. ९८८१९०४५५५), टोकाई सहकारी साखर कारखाना लि. कुरूंदा ता. वसमतनगर (शेतकी अधिकारी पी. जी. गायकवाड मो. ९४२२१७६०९८), शिऊर साखर कारखाना प्रा. लि. वाकोडी, ता कळमनुरी (ऊस पुरवठा अधिकारी व्ही. आर. तावडे मो. ९४०३०१६७२१) .
संबंधित तक्रार निवारण अधिकारी यांनी आपल्या तक्रारीचे निराकरण न केल्यास, दखल न घेतल्यास आपण प्रादेशिक सहसंचालक (साखर), नांदेड या कार्यालयाचे ई-मेल आयडी nanded@rectittima.com वर आपली तक्रार दाखल करावी अथवा ०२४६२-२५४१५६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक सहसंचालक (साखर), विश्वास देशमुख यांनी केले आहे.


