.
अन् ग्रहिस्थी महिलांनी चक्क लाठीकाठी फिरवत उपस्थितांना केले अचंबित…
——————–
प्रतिनिधी :
——————-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मास्टर सोमनाथ हेगू व त्यांच्या प्रशिक्षित टिमने आयोजित केलेल्या आत्मरक्षा अँड कॉल कराटे मार्शल आर्ट प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या गृहिस्थि महिलांनी चक्क उपस्थितांसमोर प्रात्यक्षिक दाखवताना लाठीकाठी फिरवून अचंबित केले. उपस्थित नागरिकांनी महिलांचे लाठी काठी प्रात्यक्षिकांचे कौतूक करीत नारीशक्तीचा सन्मान केला.

आत्मरक्षा अँड ऑल कराटे मार्शल आर्ट स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने महिला व मुलींसाठी आत्मसंरक्षण व स्टिकचे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरासमोर आयोजित केले होते. कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सुनिताताई बाहेती, तहसिलदार शारदाताई दळवी, महिला पोलीस अधिकारी अंबिका चव्हाण, कुसूमताई पडोळे, डॉ वैशाली डिग्रसे, डॉ पार्डीकर मॅडम, नगरसेविका डॉ रेणुका ताई पतंगे, कॅनरा बँकेच्या व्यवस्थापक श्रद्धा चव्हाण, डॉ अश्विनी टाक, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक, दीपक कुलथे, पत्रकार अनिता चव्हाण आदींची उपस्थिती होती. या शिबिरात मुलींबरोबरच महिलांनीही मोठा प्रतिसाद देत आपला सहभाग वाढवला. तब्बल १७० महिला व मुलींनी मोफत प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेत प्रशिक्षण घेतले.

विशेष म्हणजे गृहिस्ती असलेल्या व मध्यमवयीन महिला नेमकं कशाप्रकारे लाठी काठी फिरवण्याचे प्रशिक्षण घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र मंगळवार ता.१० संपन्न झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी महिलांनी मुलींनाही लाजवेल अशी लाठी काठी फिरण्याच्या प्रात्यक्षिकाचा नमूना सादर करीत उपस्थित प्रमुख पाहुणे व नागरीकांना अचंबीत केले. तहसिलदार शारदाताई दळवी यांनी प्रशिक्षित महिलांचे कौतुक करीत गृहिस्थी व मध्यमवयीन असलेल्या महिला एवढा सराईत काठी लाठी चालवू शकतात हे पाहून खूप आनंद झाला असल्याचे म्हणाल्या. तर पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक यांनी समाज व कुटुंब घडविण्यात महिलांचे मोठे योगदान असल्याचे सांगून आयोजक व प्रशिक्षित महिलांचे कौतुक केले. नगरसेविका डॉ रेणुका ताई पतंग यांनी महिला व मुलींना प्रशिक्षित करण्यासाठी नगरपरिषदे कडून काही गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करीत महिलांवर कौतुकाचा वर्षाव केला. त्याबरोबरच अनेक प्रशिक्षित महिलांनी आपले मनोगत व्यक्त करीत आयोजकांचे ऋण व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक मास्टर सोमनाथ हेगू, मास्टर संभाजी भोसले, मास्टर सीमा पाठक, मास्टर आकांक्षा दवणे, सचिन दहिवाळ सोहम धोंडे पंकज मगर पायल चव्हाण संस्कृती चंदेल गुंजन कारले संध्या क्षीरसागर, अथश्री डहाळे, श्रेयस हेगू, राणा चंदेल यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन अश्विनी गुजराती यांनी केले तर आभार पुनम टाक यांनी मानले.


