
“करा योग रहा निरोगी” जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन…
—————-
वसमत :
—————-
येथील ओम गार्डन मंगलकार्यालय येथे अनेक वर्ष्यापासून विनामूल्य नियमित दररोज सकाळी ५ वाजता योगवर्ग योग शिक्षक अरविंद जाधव व डॉ. एन. एन कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतो.
21 जून आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्य योग योग साधना परिवाराकडून ता. १८, १९, २०, आणि २१ शनिवार या चार दिवसांचे विशेष योग प्रशिक्षण शिबीर योग शिक्षक अरविंद जाधव व डॉ. एन. एन. कुंटे यांनी आयोजन केले आहे. या विशेष योग प्रशिक्षण मध्ये रोज वेगवेगळ्या आजरांची माहीती तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाचे शारीरिक व मानसिक आरोग्य निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.
तरी वसमत शहरातील सर्वांनी स्वतःच्या निरोगी आयुष्यासाठी या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन दररोज आपल्या कुटुंबाला सोबत, इष्ट मित्रांसहित ओम् गार्डन मंगल कार्यालय येथे सकाळी रोज ठीक पाच वाजता उपस्थित रहावे अशी विनंती योग साधना परिवाराचे अध्यक्ष अरविंद जाधव व डॉ. एन. एन. कुंटे यांनी विनंती केली आहे.
*या योगवर्गाचे वैशिष्ट्य*
नियमित वर्गाला मध्ये येणाऱ्या सदस्यांचा *वाढदिवस* साजरा करण्यात येतो.तसेच दर 3-4 महिन्यात साधकाची B.P. – SUGER- ECG,SONOGRAPHY- ,WAIGHT.ईत्यादी तपासणी मोफत केली जाते. मोफत योगाभ्यास /व्यायाम /आसने / वैद्यकीय सल्ला दररोज दिला जातो. प्रत्येकाच्या आरोग्याकडे /व्यायाम करताना वैयक्तिक लक्ष दिल्या जाते. ईच्छुक सदस्याची सहल 3-4 महिन्याला आयोजित केल्या जाते. आरोग्याविषयी प्रतेक प्रश्नाचे उत्तर विनामुल्य योग्यमार्गदर्शन हिच आमची सेवा. या विशेष योग प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेणारांचे
२१जुन २०२५ रोज शनिवार आंतरराष्ट्रीय योग दिवस व योग स्पर्धक विजेत्या साधकांना पारितोषिक वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
*चौकट*
गुरुवार दि.१९ जुन २०२५ वसमत योग महोत्सवाचा शिबिराचा दुसरा दिवस .सकाळी ठीक पाच वाजता सर्व उपस्थितांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून योग शिक्षिका सौ.शिल्पाताई दलाल यांनी अतिशय सुंदर योग प्रशिक्षण दिले.सपुर्ण ओम् मंगल कार्यालय आज उपस्थितांनी तुडुंब भरले होते.उशीरा येणार्याना जागा अपुरी पडली होती .
उद्या दि २० आणि २१ जुन रोजी योग साधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष योग शिक्षक अरविंद जाधव हे प्रशिक्षण देणार आहेत तरी वसमत शहरातील व परिसरातील महिला -पुरुष नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन दररोज जास्तीत जास्त संख्येने वेळेवर सकाळी ठीक 5 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
