
नेत्ररोग शिबिराचे आयोजन, पदाधिकारी कार्यकर्ते, नागरीकांनी उपस्थित रहावे – डॉ क्यातमवार
——————-
प्रतिनिधी :
——————
शिवसेना (शिंदे गट) वसमत शहर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते रविवारी ता.१२ सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे. प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ डॉ मारोती क्यातमवार यांच्या निवासस्थानी हा उदघाटनाचा सोहळा संपन्न होणार आहे.
प्रसिद्ध वैद्यकीय तज्ञ तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ मारोती क्यातमवार यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परिणामी शिंदे शिवसेना शहरासह तालुक्यात राजकीयदृष्ट्या मजबूत झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे कार्यक्रम सुरू झाल्याने पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या राजकीय चर्चा तसेच बैठका होऊन संपर्क वाढावा यासाठी डॉ मारोती सौ सविता क्यातमवार यांनी पक्ष कार्यालयाची निर्मिती केल्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदरील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते रविवारी करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा यांची उपस्थिती राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम, माजी सभापती संजय बोंढारे, महिला जिल्हाप्रमुख रेखा ताई देवकते यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामकिशन झुंझूर्डे, तालुकाप्रमुख राजू चापके, विधानसभा प्रभारी मच्छिंद्र सोळंके, युवासेना उपजिल्हा प्रभारी बाबा आफुने , शहर प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, विधानसभा प्रमुख विजेंद्र क्षीरसागर, दिपक इंगोले, युवासेना तालुकाप्रमुख विशाल ढोरे, शिवराज यशवंते, युवासेना शहरप्रमुख विनायक सातपुते, प्रथमेश जैन, मनोज चव्हाण, अरुण तोतला, राजेश पवार, श्रीमती चाटणकर, वैष्णवी कड , भद्री कदम, ज्ञानेश्वर दलाल, योगेश चेपुरवार, पुरुषोत्तम इपकलवार यांनी केले आहे.
नेत्ररोग शिबिराचे आयोजन…
यावेळी आयोजित नेत्ररोग शिबिराचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नेत्ररोग तज्ञ डॉ शितल क्यातमवार रुग्णांची नेत्र तपासणी व उपचार करणार आहेत. जास्तीत जास्त नागरीकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन क्यातमवार परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे.
