
श्री शिवेश्र्ववर बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न , सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर…
——————-
प्रतिनिधी :
——————-
वसमत येथिल श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँकेस आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १ कोटी ५९ लाख ५ हजार रुपयांचा नफा झाला असून बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी रविवार ता.२० दिली.
वसमत येथील श्री शिवेश्वर नागरी सहकारी बँकेची बँकेची ३० वी वार्षीक सर्व साधारण सभा बँकेच्या मुख्य कार्यालयात रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांची उपस्थिती होती. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कोसलगे व सर्व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.
यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री बोड्डेवार यांनी अर्थिक वर्षे २०२४-२०२५ चा लेखाजोखा सादर करताना सभासदांना १०% लाभांष जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर ३१ मार्च २०२५ अखेरवर बँकेचा एकून स्वानिधी १७ कोटी १२ लाख, एकून ठेवी . १७८ कोटी १७ लाख ६९ हजार, गुंतवणूक ६२ कोटी ३८ लाख ५७ हजार, असून कर्ज वाटप १०९ कोटी ७ लाख ९२ हजार तर नफा १ कोटी ५९ लाख ५ हजार झाला असून बँकेचा नेट एन.पी.ए. ० टक्के असल्याची माहिती दिली.
यावेळी बँकेचे संचालक विनोद झंवर, नागनाथराव कोम्पलवार, वसंत चेपुरवार, शेख मैनोद्यीन संदलजी, बालाजी माळवदकर, राधाकिशन साबने, डॉ. धोंडीराम पार्डीकर, श्रीमती शकुंतलाबाई देवने, सौ. रूपाली दगडू, दत्तात्रय दलाल, बालासाहेब जाधव, नारायण लासीनकर, भारत नामपल्ली, अॅङ दिपक कट्टेकर, रमाकांत भागानगरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अशोक सातपुते, डॉ. प्रा. सोनाजी पतंगे, अॅङ मनोहर वाघीले, व सभासद, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
