समोर आई- वडिलांचे स्वप्न, कठोर परिश्रम, अभ्यासात सातत्य अन् आत्मविश्वासाच्या बळावर पहिल्या प्रयत्नात मिळवले यश…
———————
प्रतिनिधी :
———————
दोन्ही मोठ्या बहिणी व भाऊ उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी झाले. इतर भावंडांबरोबरच आपल्या लहान मुलाने देखील मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न आई- बाबांनी उराशी बाळगले होते. आई बाबांचे स्वप्न पूर्तीसाठी कठोर परिश्रम आणि अभ्यासातील सातत्याने नांदेड सारख्या ठिकाणी पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाऊंटट झालो. सिंदगी गावातील पहिला सीए होण्याच्या आनंद खुप मोठा होता परंतू त्याहीपेक्षा हा आनंद व स्वप्न पुर्ण झालेले पाहण्यासाठी आई नसल्याचे सर्वात मोठे दुःख होते. ही यशोगाथा आहे कळमनुरी तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या सिंदगी गावातील सेवानिवृत्त शिक्षकाचा मुलगा आदेश कुसूम देवराव मगर या यशस्वी विद्यार्थ्यांची.
कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील देवराव मगर हे जिल्हा परिषदेचे शिक्षक. नोकरीनिमित्त त्यांना विविध ठिकाणी शिक्षक म्हणून काम करीत असताना डोंगरकडा गावासह वसमत येथे नोकरीनिमित्त राहावे लागले. त्यांना दोन मुली व दोन मुले आहेत. मोठी मुलगी स्वाती मगर हिने अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेत स्वावलंबी झाली आहे तर दुसरी मुलगी कोमल मगर हिने अथक परिश्रमाच्या जोरावर देशातील नामांकित संस्थेमध्ये शिक्षकेची नोकरी मिळवली. संदेश मगर हा देखील अभियांत्रिकेचे उच्च शिक्षण घेऊन सॉफ्टवेअर इंजिनियर बनला. दरम्यान वडील देवराव मगर व आई कुसूम मगर यांनी इतर भावंडाबरोबरच लहान मुलगा आदेश याने देखील मोठा अधिकारी व्हावे असे स्वप्न पाहिले होते.
आदेश तसा पहिलीपासूनच शाळेत पहिल्या क्रमांकाचा मानकरी रहायचा. त्याने त्याचा शैक्षणिक आलेख कधीच कमी होऊ दिला नाही. मात्र आदेश इयत्ता सातवीत असताना आई कुसूम मगर यांना आजाराने गाठले होते तर इयत्ता बारावीत असताना दुर्धर आजाराने आईचे दुःखद निधन झाले. आईच्या अकाली जाण्याचे दुःख आणि त्याच वेळेला आईने मोठा अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न यापैकी मी आईने पाहिलेले स्वप्न पुर्ण करण्याचे ठरवले. वडील शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले असल्याने सीए ची तयारी करण्यासाठी पुणे येथे न जाता नांदेड येथूनच सीए पदाला गवसणी घालण्याचे ठरवले.
अनेकांनी सीए व्हायचे असेल तर पुण्याला जाण्याचा सल्ला दिला. परंतू मला माझ्या परिश्रमावर विश्वास होता. अभ्यासात सातत्य, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर आदेश मगर याने पहिल्याच प्रयत्नात सीए पदाला गवसणी घातली. एवढेच नाही तर पुणेच नाही तर नांदेड सारख्या ठिकाणी सुद्धा यश मिळवता येते हे सिद्ध केले. त्याचबरोबर सिंदगी गावातील पहिला- वाहिला चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होण्याचा मान मिळवला आहे.
यशस्वी मंत्र…
जिवनाती ध्येय समोर ठेवून कठोर परिश्रमाची तयारी व तेवढाच आत्मविश्वास ठेवल्यास आपले व आपल्या आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण होऊ शकते.
आदेश कुसुम देवराव मगर


