सुर दीपावली २०२५ : वसूमती सांस्कृतिक प्रतिष्ठानची वसमतकरांना मेजवानी, सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन…
——————–
प्रतिनिधी :
——————-
वसमत येथे दिपावली निमित्त प्रथमच वसूमती सांस्कृतिक प्रतिष्ठान वसमत यांच्या वतीने या वर्षी ‘सुर दिपावली 2025’ अंतर्गत भावगीत व भक्तीगीतानी सजलेल्या सुरेल व सुंदर मैफिलीचे आयोजन सुरमणी प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात रविवारी ता.१९ सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमा करिता सुप्रसिद गायीका कु. भक्ती पवार (मुंबई) व सुरमणी धनंजय जोशी तर तबला वादक प्रशांत गाजरे (नांदेड) , पखवाज वादक विश्वेश्वर कोलंबीकर, संवादिनी लक्ष्मीकांत धानोरकर याची साथ संगत लाभणार आहे. रविवारी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता सुरमणी प्रा.दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह,वसमत येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमा साठी आपण रसिक प्रेमिनीं सह कुटूब सह परिवार उपस्थित राहुन आनंद घेण्याचे आवाहन वसूमती सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वसंत चेपुरवार, प्रा. पंजाब अंभोरे, प्रकाश इंगळे, सुनिल कबाडे, सिताराम म्यानेवार, आनंद बडवणे, मनोज चव्हाण, लक्ष्मीकांत धानोरकर, आदिती देशपांडे, रविकिरण कापूसकरी, जयश्री पाटील, साक्षी जोशी,कु. गीतांजली भोंग यांनी केले आहे.


