
शांतीदूत जयंती उत्सव समिती, अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान व सावली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन…
वसमत :
अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक , आसेगाव कार्नर येथे शांतीदुत जयंती उत्सव समिती अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान वसमत , सावली प्रतिष्ठान कन्हेरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील शिबीरात 49 रक्तदात्यानी रक्तदान करूण आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. दात्यांमध्ये दोन महिलांनी रक्तदान करूण महिलांचे प्रतिनिधीत्व केले .
स्टेशन मास्टर देवानंद गायकवाड व राहुल थोरात यांचा शिबीरात वाढ दिवस साजरा करण्यात आला . प्रियंका व राहुल थोरात या दाम्पत्यानी रक्तदान करूण वाढ दिवस साजरा केला .
या वेळी आयु . यशवंतराव उबारे , डॉ . एम आर . क्यातमवार , नेत्ररोग तज्ञ डॉ . नागनाथ काळे , पि .सी . कांबळे , डब्लू . जी . लोखंडे , डॉ डि . एस तारू ,के . डी . वाटोडे , डि . के थोरात , सय्यद इमरान इंजि , राजकुमार जी एंगडे , संतोष नांगरे , भीमराव सरकटे , विजय कुमार एंगडे , ॲड सत्यपाल सुर्यतळ , अरवींद कठाळे , संजय नांगरे , राजु कडतन , मिलींद आळणे समता दुत , देवानंद सोनाळे , संदिप पवार , दिनेश बुजवणे , मिलिंद शिवभगत , विजयकुमार मुळे , अंतेश्वर नरवणे , ब्लॅड बँकेचे डॉ . प्रियंका यादव , श्री कुणाल महागडे समाज सेवाअधिक्षक , अतुल ताकसांडे दिपक शिंदे , प्रज्ञा भवरे श्यामराव जोंधळे शेख बसीर अदि मान्यवर उपस्थित होते .
शिबीर यशस्वीते करिता
राजकुमार एंगडे , संतोष नांगरे , डॉ . डि एस तारू , संजय नांगरे चदगव्हाण यांनी परिश्रम घेतले .
