हर हर महादेवाच्या जय घोषणेत हजारो शिवभक्तांचा पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग
———————
प्रतिनिधी :
———————
वसमत येथील ग्रामदेवत असलेल्या श्री सिद्धेश्वराचा महाशिवरात्रीनिमित्त पालखी उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने शनिवारी ता.१४ संपन्न झाला. महिला भजनी मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग आणि गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांची पालखी उत्सवातील उपस्थिती भाविकांचा उत्साह वाढवणारी ठरली.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी वसमत येथील ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वराची महाशिवरात्रीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी ७ वाजता भगवान सिद्धेश्वर रुद्राभिषेक केल्यानंतर दुपारी भजन संपन्न झाले. पालखी उत्सवासाठी सकाळपासूनच पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाचे भाविक तसेच नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यातील भाविकांनी लासिन मठ सिद्धेश्वर मंदिरात गर्दी केले होती. सायंकाळी ५.३० वाजता पालखी उत्सवात सुरुवात झाली. पालखीमध्ये गुरुवर्य करबसव शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती. तर सहभागी हजारो शिवभक्तासह महिला भजनी मंडळानी हर हर महादेवाच्या जय घोषणा देत शहराचे वातावरण शिवमय केले. शहरातील भाविकांनी ठिकठिकाणी पुष्प अर्पण करीत पालखी दर्शन व गुरुवर्यांचे दर्शन घेतले. पालखी सोहळा सत्यनारायण टॉकीज, सत्याग्रह चौक, झेंडा चौक, खिरणीचे झाड मार्गे लासिन मठ सिद्धेश्वर मंदिरात आली. यावेळी महाआरती नंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात आली.


