श्रीरामपुरच्या चोरट्याविरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
——————
प्रतिनिधी :
——————
वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्यात भंगार पाहण्याचे कारण दाखवून आतमध्ये प्रवेश केलेल्या चोरट्याने १९ किलो वजनाचा तांब्याचा धातूचा गोल पंखा चोरुन नेत असताना कारखान्याच्या गेटवर सुरक्षा जमादार कुंडलीक क्षीरसागर यांनी मोठ्या शिताफीने पकडले. चोरटा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपुर येथील असून त्याच्यावर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी ता.२० रोजी पुर्णा सहकारी साखर कारखान्यात भंगार पाहण्यासाठी श्रीरामपूर येथील व्यावसायिक आले होते. त्यांच्यासोबत शाह शाहेबाज सलीम वय २६ वर्ष रा.श्रीरामपूर हा देखील आला होता. भंगाराची पाहणी करुन बाहेर पडत असताना गेटवर कर्तव्य बजावत असलेले सुरक्षा जमादार यांना संशय आल्याने त्यांनी शाह शाहेबाज सलीम यांची झडती घेतली. यावेळी त्याने जिन्सच्या पँडमध्ये इलेक्ट्रिक मोठ्या पंपातील तांब्याच्या धातूचा गोल पंखा (एम्प्लायर) १९ किलो वजनाचा व १५००० हजार रुपये किंमत असलेला चोरुन नेत असताना आढळला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी चोरट्यास मुद्देमाला सहित पकडून ठेवले. त्यानंतर वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरट्याला स्वाधीन केले. सुरक्षा जमादार कुंडलिक क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी शाह शाहबाज सलीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरक्षा जमादार कुंडलिक क्षीरसागर यांच्या दक्षतेमुळे चोरट्यांची चोरी असली असल्याने त्यांचे पूर्ण साखर कारखाना प्रशासनाच्या वतीने कौतुक केले जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेट जमादार व्ही एन उपरे हे पुढील तपास करीत आहेत.


