हु बहिर्जी स्मारक महाविद्यालयात मराठी पत्रकार दिन साजरा, पत्रकारांना केले सन्मानित…
—————–
प्रतिनिधी :
—————–
सध्या विविध विविध माध्यमावर बातम्या प्रकाशीत होतात परंतू त्याची शासन व्यवस्थेकडून दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करुन पत्रकारांनी शासन प्रशासनानू दखल घ्यावी एवढी विश्वासहार्यता आपल्या पत्रकारितेमध्ये निर्माण करावी असे आवाहन माजी आमदार पंडितराव देशमुख यांनी केले.
येथील हु बहिर्जी स्मारक महाविद्यालयात मराठी पत्रकारितेचे आद्य प्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार पंडितराव देशमुख यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार सत्यविजय अनवेकर मामा, कनिष्ठ महाविद्यालयीन समितीचे अध्यक्ष अँड. रामचंद्र बागल, प्राचार्य मा मा जाधव, लिटल किंग्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक डॉ नामदेव दळवी, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी बाबुराव खिल्लारे आदींची उपस्थिती होती.
अध्यक्ष समारोप करताना माजी आमदार पंडितराव देशमुख यांनी पुढे बोलताना पत्रकारांनी अन्यायाच्या विरोधात थांब भूमिका घेऊन सत्याचा शोध घ्यावा तसेच शोध पत्रकारिता करावी असे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार तथा शिव सकाळचे संपादक संजय बर्दापुरे यांनी आजची पत्रकारिता व आव्हाने तसेच माध्यमांचे अर्थकारण यावर प्रकाश टाकला. डॉ नामदेव दळवी यांनी डिजिटल युवर सुद्धा मुद्रित माध्यमांवर नागरिकांचा विश्वास असल्याने मुद्रित दैनिकांचे महत्त्व कमी झाले नसल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार सत्यविजय अनवेकर मामा यांनी जुन्या काळातील पत्रकारितेला उजाळा देत पत्रकार बांधवांनी शोध पत्र कविता करावी असा सल्ला दिला. अँड रामचंद्र बागल यांनी यावेळी मनोगत व्यक्त करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य मा मा जाधव यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर व लोकशाही मूल्य जपणुकीत त्यांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला संजय बर्दापुरे, मारोतराव धोंडे, शरीफ आलम, श्रीधर वाळवंटे, भगवान जाधव , शेख खदीर, गिरीश देशमुख यासह पत्रकारांची उपस्थिती होती. तर उपप्राचार्य डॉ स्वामी, डॉ पिंपरणे यासह प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन डॉ अनिल मुगूटकर यांनी केले तर आभार डॉ शारदा कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबंधक डॉ पांडुरंग बर्वे, अनिल पंडीत यांनी पुढाकार घेतला.


