
,नांदेड येथे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची संयुक्त बैठक संपन्न..
——————
प्रतिनिधी :
——————
तिरुपती येथील महासभेच्या नियोजित भक्त निवासाचा बांधकाम शुभारंभ लवकरच करुन आगामी दीड वर्षात लोकार्पण सोहळा करण्यात येईल असा विश्वास महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी रविवारी ता.२० नांदेड येथे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या संयुक्त बैठकीत व्यक्त केला.
यावेळी काशी अन्नपूर्णा सत्रम चे महासचिव तथा पुंगलुरु सीतामाई ट्रस्टचे विश्वस्त विलास बच्चु यांचा भव्य सत्कार महासभेचे अध्यक्ष नंदकूमार गादेवार यांच्या हस्ते करण्यात आला.
आंध्र प्रदेशचे खासदार टी जी वेंकटेश व विलास बच्चु यांच्या माध्यमातून तिरुपती येथे सीताम्मा ट्रस्ट कडून शहरालगत सुमारे साठ कोटी रुपयांची एक एकर जागा विनामुल्य मिळवून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा महासभेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या जागेची कायदेशीर प्रक्रिया , डाक्युमेंट रजीस्ट्रेशन पूर्ण केले व संबधीत कागदपत्रे मिळविली. हा करार पुर्णपणे महासभेच्या हिताचा, भविष्यात कसलीच अडचण येणार नाही याची काळजी घेवून करण्यात आला.महासभा अस्तित्वात असे पर्यंत अधिकार अबाधित रहातील असाच मसुदा तयार करण्यात आला. यावेळी विलास बच्चु यांनी आपल्या मनोगतातून गादेवार यांचे कौतुक करून, मा.खा.टी.जी.वेंकटेश यांचा विश्वास त्यांनी कमावला त्यामुळेच त्यांनी या करारास मान्यता दिल्याचे सांगून भविष्यात भक्त निवासाची संपुर्ण इमारत पुर्ण होईपर्यंत लागेल ती मदत व सहकार्य करण्याची ग्वाही दिली व देशात कुठेही नसलेली एकजूट महाराष्ट्रातील महासभेत मी अनुभवल्याचे सांगून आपण सर्व समाज बांधवांनी महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार व त्यांच्या सहकार्यांवर विश्वास दाखवावा व सहकार्य करावे असे आवाहनही विलास बच्चु यांनी केले.
यावेळी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी टेंडर समिती व कार्यकारी समिती जाहीर केली तसेच निधी संकलनासाठी , रुम व इतर दालनासाठी प्रायोजकासाठीचा आराखडा ही जाहीर केला.या प्रकल्पासाठी अंदाजे पंचवीस कोटीचा खर्च अपेक्षीत असून तो कसा ऊभा करायचा याचेही विश्लेषण केले. नियोजित भक्त निवासाचे कार्यकारी मंडळ देणगीदारातुनच निवडले जाइल असाही प्रस्ताव मंजुर करण्यात आला. कार्याध्यक्ष भानुदासराव वट्टमवार, बांधकाम समतिचे अध्यक्ष सुर्यकांत शिरपेवार यांनी मार्गदर्शन केले व अनेक जिल्हाध्यक्षांनी मनोगत व्यक्त करुन निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली.
यावेळी हिंगोली जिल्हा महासभेच्या वतीने गिरीश गुंडेवार, आनंद निलावार, प्रा डॉ अनिल मुगुटकर, राजु गुंडेवार यांनी नंदकुमारजी गादेवार व विलास बच्चु यांचा सत्कार केला. प्रास्ताविक महासचिव गोविंद बिडवेई यांनी केले. सूत्रसंचालन प्रा विजय बंडेवार यांनी तर आभार प्रणव मनुरवार मानले. सदरील सभेसाठी ऊपाध्यक्ष नंदकुमार मडगूलवार,सुधीर पाटील, सदानंद मेडेवार ,सखाराम निलावार ,अनिल मनाठकर,शंतनू कोडगिरे, बिपिन गादेवार,ज्ञानेश्वर महाजन,प्रदीप कोकडवार ,आर्कीटेक्ट ऋषिकेश शिरपेवार, यांच्या सह महासभेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
