अप्पर पोलीस अधीक्षक त्यांचे पथक व वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याची कार्यवाही…
——————–
प्रतिनिधी :
——————-
हिंगोली अप्पर पोलीस अधीक्षक यांचे पथक व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने रविवार ता.१५ अवैध वाळू वाहतुकी विरुद्ध करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कार्यवाही मध्ये २ हायवा व १ ट्रॅक्टर सह ३५ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांचे पथक पोस्टे औंढा हददीत पेट्रोलींग करीत असतांन मिळालेल्या गोपनीय माहितीवरून देवाळा फाटा येथील रोडवर एक हायवा टिपर अवैधरित्या रेतीची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यास पकडुन चालक दत्ता यादवराव कुटे वय २९ रा. चिमेगाव ता. औंढा ना. जि. हिंगोली तसेच दुसरा चालक सुनिल सांगळे व सदर टिपरला संरक्षण देणारी स्वीप्ट डिझायर कार क. एमएच १२ एएक्स ००१७ चा चालक यांचे विरूध्द पोलीस स्टेशन औंढा येथे अवैध वाळु चोरी व वाहतुक संदर्भाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच चालकाच्या ताव्यातुन एक हायवा टिपर क एमएच २२ व्हीव्ही ५१६ व अंदाजे ०२ ब्रास रेती असा १५ लाख २० हजार रूपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.

तसेच दुस-या कार्यवाही मध्ये जवळा बाजार पोलिस चौकी हददीतील नालेगाव परिसरात एक ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने सदर ट्रॅक्टर चालक अरबाज खान मोईन खान पठाण रा. नालेगाव ता. औंढा ना. यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेवुन त्याचेकडुन ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा ०५ लाख ५५ हजाराचा मुददेमाल जप्त केला आहे.
तसेच तिस-या एका कार्यवाही मध्ये पोलीस स्टेशन वसमत ग्रामीण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे व त्यांचे पथक मिळुन पोस्टे हददीत पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पळसगाव पाटी येथे ०१ टाटा कंपनीचा टिपर क एमएच १२ ईएफ ४७८८ हा अवैधरित्या रेती वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यास पकडुन चालक अमोल राजु कानोजी उर्फ भंडारी वय २१ वर्ष रा. मोर चौक, परिमल नगर, नांदेड यास टिपरसह ताब्यात घेवुन टिपर व अवैध रेती असा १५ लाख १० हजाराचा मुददेमाल जप्त करून पोस्टे वसमत ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तिनही वाळु वाहतुकी विरूध्द कार्यवाहीमध्ये एकुण ३५ लाख ८५ हजाराचा मुददेमाल जप्त करून ०२ टिपर चालक, ०१ ट्रॅक्टर चालक व टिपरला संरक्षण देणारा कारचालक अशा एकुण ०५ इसमाविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, सुमित टाले, सतिष नरवाडे, विनोद कुटे तसेच पोस्टे वसमत ग्रामीणचे सपोनि गजानन बोराटे, पोलीस अंमलदार विजय उपरे, नामदेव बेंगाळ, चालक शहाजी बामणीकर यांच्या पथकाने केली आहे.


