वसमत येथील आडत दुकानात सोमवारी भरदिवसा चोरी , चोरट्यांचे पोलिसांसमोर आव्हान…
——————
प्रतिनिधी :
——————
दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी गहू, ज्वारी खरेदीचे नाटक करीत एका आडत दुकाणातील गल्ल्याचे लॉक तोडून रोख पावणे दोन लाख रुपये पळवल्याचा थरार परभणी रोडवरील दादरा जवळील आवडत दुकानात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. सदरील चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेज दिवसभर समाजमाध्यमावर फिरताना दिसली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.
याबात मिळालेल्या माहितीनुसार वसमत शहरातील परभणी रोडवरील रेल्वे दादरा जवळ अशोक काळे यांचे आवडत दुकान आहे. दिवाळीमुळे मागील चार.पाच दिवसाच्या सुट्ट्यानंतर सोमवारी ता.२७ थांबलेली धान्याची आवक वाढणारं असल्याने खरेदीसाठी रोख रक्कम दुकानात ठेवली होती. दिवसभराच्या खरेदी नंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आडत दुकान बंद करण्याच्या काही वेळ अगोदर दुचाकीवर दोन इसम आले. त्यांनी दुकानदारास गहू व ज्वारी खरेदी करण्याचे सांगून धान्य दाखविण्यास सांगितले. यावेळी दोघांपैकी एका चोरट्याने धान्य पाहण्याचे नाटक करीत दुकानदारास झुलवत ठेवले तर एका चोरट्याने शिताफीने गल्ल्या चे लॉक तोडून रोख रक्कम एक लाख 70 हजार रुपये ताब्यात घेऊन दोन्ही चोरटे दुचाकीवर लंपास झाले. सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेज विविध समाज माध्यमावर फिरत आहे. चोरी झाल्याचे लक्षात येताच दुकान मालकांनी शहर पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत मंगळवार ता.२८ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे दुकान मालक अशोक काळे यांनी सांगितले.
व्यापारी, नागरीकांत भीतीचे वातावरण….
वसमत शहरात सलग दोन दिवस चोरीच्या घटना घडल्याने व्यापारी, नागरीक भीती व्यक्त करीत आहेत. घरफोडीत लाखो रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्यानंतर आडत दुकानातील रोख रकमेच्या चोरीने नागरीक हादरले आहेत.


