शहर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल., आरोपीस अटक न झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार – डॉक्टर असोसिएशन
वसमत,ता.९
शहरातील मोंढा भागातील एका खाजगी रुग्णालयात एका रुग्णाने तपासणी फिस व मेडिकलचे बिल का मागीतले यावरुन तेथील कर्मचार्यास मारहाण करीत वस्तूची तोडफोड केली. तसेच तेथील डॉक्टरांना जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता.८ गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र दोन दिवसांच्या आत आरोपीस अटक होऊन कारवाई न केल्यास हिंगोली जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेणार असल्याचे डॉक्टर असोसिएशन बैठकीत ठरले आहे.
याबाबत माहिती अशी की वसमत तालुक्यातील बगडद येथील एक रुग्ण
डॉ रामेश्वर मोरे यांच्या मथुराई हाँस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री १०.३० च्या सुमारास उपचारासाठी आला होता. या वेळी डॉ रामेश्वर मोरे यांनी त्यांची तपासणी करुन औषधी आणण्यास सांगितले. मेडिकल वर औषधी घेतल्यानंतर त्यांनी फिक्स व औषधीच्या पैशाची मागणी केली असता वाद सुरु केला. तेथल कर्मचारी अजय मुधळे यांनी तुम्ही डॉक्टरांना भेटा असे म्हणाले असता सदरील रुग्णांनी अजय यास शिविगाळ करीत थापडबुक्यांनी मारहाण केली. तसेच सोबतच्या इतर दोन व्यक्तींनी सुध्दा मारहाण केली. मारहाण होत असलेली पाहून सहकारी कर्मचारी विलास शेंडेराव, विशाल सुर्यतळ भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना मारहाण करण्यात आली. तसेच डॉ रामेश्वर मोरे यांना तपासणी फिस व मेडिकलचे बिल का मागितले म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत अजय मुधळे यांनी बुधवारी ता.८ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असता आरोपी विरुद्ध केवळ एनसी अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील बाब ही गंभीर स्वरुपाची असल्याने डॉक्टर असोसिएशनच्या वतीने बैठक घेतल्यानंतर गुरुवारी ता. ९ डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ मारोती क्यातमवार, डॉ निलेश डिग्रसे, डॉ गंगाधर काळे, डॉ तुकाराम चव्हाण, डॉ धोंडीराम पार्डीकर, डॉ सचिन महाजन, यासह सर्व डॉक्टरांनी शहर पोलिस ठाण्यात जावून पोलिस निरीक्षक सुधिर वाघ यांची भेट घेतली तसेच सदरील प्रकार चुकीचा असून यामुळे रुग्णास चोविस तास रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या मनात भिंती निर्माण झाली आहे. यांचा परीणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो असे सांगुन आरोपींस अटक करुन त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली.
डॉ मोरे यांच्या फिर्यादीनंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…
डॉ रामेश्वर मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अखेर गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात विशाल शिदे, ओंकार शिंदे व सोन्या शिंदे राहणार बगडद ता.वसमत यांच्याविरोधात शिविगाळ, मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीना अटक न केल्यास एसपींची भेट घेणार…
दरम्यान डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सदरील गंभीर मुद्यावर सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक घेतली. या बैठकीत दोन दिवसांत सदरील आरोपितांनाऊअटक करुन कायदेशीर कडक कारवाई न झाल्यास असोसिएशनचे शिष्टमंडळ हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेट देवून निवेदन देणार असल्याचे डॉ निलेश डिग्रसे यांनी सांगितले.
- कोट…
डॉक्टरांना मारहाण दुर्दैवी
दरम्यान आपले सुख .दुःख, बाजूला ठेवत रुग्णांना अहोरात्र वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना शिविगाळ व मारहाण होत असेल तर हे दुर्दैव आहे. यामुळे डाँक्टरांच्या मनात भीती निर्माण होऊन त्याचा परीणाम रुग्ण सेवेवर होऊ शकतो. अशा प्रवृत्तींना प्रशासनाने वेळीच पावबंद केले पाहिजे.
डॉ मारोती क्यातमवार, अध्यक्ष, डॉक्टर असोसिएशन, वसमत.
