
महामहिम राष्ट्रपती यांच्या समोर पारधी आदिवासी समाजाचे प्रश्न व अद्यवत माहिती देवून अवगत केल्याने श्री शिंदे यांचे कौतूक..
——————-
वसमत :
——————-
भारतीय जनता पार्टीचे आदिवासी मोर्चाचे प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे यांनी पारधी आदिवासी समाजामध्ये केलेल्या कामाची दखल घेवून राष्ट्रपती भवन दिल्ली येथे त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी समाजाचे विविध प्रश्न व अडचणी मांडून प्रतिनिधीत्व केले. या माध्यमातून त्यांनी दिल्ली येथे हिंगोली व वसमतच्या नावाची मोहोर उमटवली. या बहुमानाबद्दल वसमत शहर भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपाचे आदिवासी मोर्चाचे प्रदेश महामंत्री सुदर्शन शिंदे यांचे आदिवासी तसेच पारधी समाजात गेल्या अनेक वर्षापासून मोठे काम आहे. त्यांच्या अडिअडचणी, कौटूबिक, समाजिक, शैाक्षणिक आदी प्रश्न शासनाच्या निदर्शनस आणून देण्याचे काम केले आहे. सदरील समाज हा भटक्या स्वरूपात असल्याने त्यांच्या उदनिर्वाहपासून ते हाताला काम देण्यापर्यतंचे समस्या सुदर्शन शिंदे यांनी वेळोवेळी शासन दरबारी मांडल्या. या कार्याची महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दखल घेवून श्री शिंदे यांना दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे २१ जुलै रोजी पत्राद्वारे निमंत्रित केले होते. त्यावर सुदर्शन शिंदे यांनी महामहिम राष्ट्रपती समोर पारधी आदिवासी समाजाच्या विविध समस्या मांडल्या. महामहिम राष्ट्रपती यांच्या कडून वसमत सारख्या छोट्या तालूक्यातून निमंत्रण मिळणे ही हिंगोली व वसमत साठी अभिमानाची बाब होती. या बहुमानाबद्दल सुदर्शन शिंदे यांचा वसमत भारतीय जनता पार्टीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रीतीताई जैयस्वाल, संतोष हादवे, विनायक चव्हाण, प्रविण पोपळकर, गजानन चौंडेकर यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
