
अध्यक्षपदी राजू सिद्दीकी तर उपाध्यक्षपदी अँड अरुण आंबेकर यांची निवड
—————
वसमत :
—————
वसमत लाँयन्स क्लबचा दुसरा पदग्रहण सोहळा मंगळवारी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्ष पदी राजू सिद्दीकी यांची तर उपाध्यक्षपदी अँड अरुण आंबेकर यांची निवड करण्यात आली. तसेच इतर पदाधिकारी व सदस्यांच्या निवडी करुन पदग्रहणाची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लॉयन्स योगेश चेपुरवार तर पदग्रहण सोहळ्यासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून दिलीपजी मोदी, इंडक्शन ऑफिसर म्हणून योगेश जयस्वाल, चीफ गेस्ट म्हणून हर्षद भाई शहा, पंडित जी बरदाळे तसेच ज्यांच्या प्रेरणेने हा क्लब स्थापन झाला ते लॉयन्स मोहन देशमुख व प्रवीण देशमुख उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून लॉयन्सची कार्यप्रणाली, लॉयन्सचे ध्येय व उद्देश समजावून सांगितले. लॉयन्स किती निस्वार्थ हेतूने सामाजिक , आरोग्य पर्यावरण, शिक्षण क्षेत्रात काम करते हे उदाहरण देऊन सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात सर्वांना परिचित असणारे डॉ वैभव पडोळे यांनी लॉयन्सच्या कार्याची प्रशंसा करताना आपण याचा हिस्सा होणार आहोत याबद्दल आनंद व्यक्त केला, येणाऱ्या काळात चांगले उपक्रम राबविण्याची ग्वाही दिली. पदग्रहण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून लायन्स राजू सिद्दिकी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून लॉयन्स अँड. अरुण आंबेकर व लायन्स कल्याण कुरुंदकर ,सचिव म्हणून बाळासाहेब बेले यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्षपदी लॉयन्स संजीव कुमार बेंडके यांची निवड करण्यात आली. यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्यांना पदग्रहणाची शपथ देण्यात आली. यावर्षी लॉयन्स अँड.दीपक कट्टेकर ,लॉयन्स डॉ सागर सातपुते, लॉयन्स एकनाथ जगताप, लॉयन्स संदीप चव्हाण , लॉयन्स प्रा.बाळासाहेब भिंगोले , लॉयन्स प्रसन्ना देशपांडे, युनियन बँकेचे व्यवस्थापक लॉयन्स सचिन गोंडे पाटील , लॉयन्स गंगाप्रसाद डाके, लॉयन्स राजाराम जगताप यांना नवीन सदस्य म्हणून शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लॉयन्सचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. अँड. लायन्स ,अरुण आंबेकर, अँड. प्रदीप देशमुख ,लायन डॉ वैभव पडोळे, हरिहर अलसटवार,लॉयन्स,वैजनाथ कदम लॉयन्स विक्रम कुंटूरवार, लायन्स आलोक जाधव , लॉयन्स रोहित टेहरे, लॉयन्स सुहास काकडे, लॉयन्स सचिन दगडू , लॉयन्स गौस बागवान लॉयन्स कल्याण कुरुंदकर, लॉयन्स समीर कुरेशी, लॉयन्स संदीप टाक उपस्थित होते.याच कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात काम करणारे नवीन शेळके व कुरुंदा येथील सह्याद्री टोकाई गडावर सुमारे 30 हजार वृक्ष लागवड करून उजाड माळ हिरवागार करणारे मंगेश चिमणाजी दळवी यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब बेले यांनी केले तरआभार प्रदर्शन संजीव बेंडके यांनी केले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
