
१००० विद्यार्थ्यांची शिबिरात तपासणी..
——————–
वसमत :
——————-
येथील लालबहादूर शास्त्री सीबीएससी विद्यालयात लायन्स क्लब वसमत व लायन्स नेत्र रुग्णालय नांदेड यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार ता.१९ करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे लक्ष्मीकांत नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ मोहन देशमुख उपस्थित माजी नगरसेवक सचिन दगडू, बाळूमामा ढोरे, लायन्स क्लब वसमत प्राईडचे अध्यक्ष राजू सिद्दिकी , एलबीएस विद्यालयाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आदींची उपस्थिती होती. लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजनाने शिबिरास सुरुवात करण्यात आली. मागील दोन वर्षापासून लायन्स क्लब वसमत प्राईड यांच्याकडून पर्यावरण शैक्षणिक व आरोग्य या क्षेत्रात विविध उपक्रम घेतले जात आहेत. डॉ मोहन देशमुख यांनी वसमतला लायन्स क्लबचे नेत्र रुग्णालय येणाऱ्या काळात स्थापन करण्यास सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. या वेळी विद्यालयाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी लायन्स क्लबचे महत्त्व सांगून अशा प्रकारच्या उपक्रमाला शाळा नेहमी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. तसेच उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. नेत्र तपासणी शिबिरात 1000 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. प्रस्ताविक बाळासाहेब बेले यांनी केले. या कार्यक्रमासाठी अँड अरुण आंबेकर , अँड दीपक कट्टेकर, गौस भाई, शेख समीर, हरिहर अल्सटवार ,अँड प्रदीप देशमुख, संजीव कुमार बेंडके, श्री डाके आप्पा, कल्याण कुरुंदकर, एकनाथ जगताप, राजाराम जगताप, संदीप टाक, विक्रम कुंटूरवार ,डॉ सागर सातपुते, डॉ वैभव पडोळे, प्रसन्ना देशपांडे, प्रा बाळासाहेब भिंगोले , वैजनाथ कदम, रोहित टेहरे, मन्मथ सिद्धेवार यांनी पुढाकार घेतला. याबरोबरच एलबीएस शाळेचे प्राचार्य तथा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
