
वसमत नगर परिषद व सूरमणी प्रा दत्ता चौगूले समन्वय समितीचा पुढाकार
———————-
प्रतिनिधी :
———————-
वसमत येथे प्रतिवर्षाप्रमाणे सुरमणी प्रा दत्ता चौगूले स्मृती श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संगीत सोहळ्याचे आयोजन वसमत नगर परीषद व सुरमणी प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी ता.१५ रात्री ८ वाजता करण्यात आले आहे.
वसमत येथील प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक सभागृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मुख्य कलाकार म्हणून चेन्नई येथील गायक सौरभ नाईक, मुंबई येथील गायिका आसावरी बोधनकर – जोशी, देगलूर येथील बासरी वादक ऐनोद्दीन वारसी यांची उपस्थिती राहणार आहे.तसेच सहकलाकार म्हणून हार्मोनियम वादक विनायक चौधरी, भालकी, तबला वादक प्रशांत गाजरे नांदेड, व्हायोलिन वादक पंकज शिरभाते नांदेड,पखवाज वादक विश्वेश्वर जोशी नांदेड व तबला वादक प्रकाश सोनकांबळे देगलूर यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यांना सुरमणी प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक समन्वय समितीच्या वतीने आनंद बडवणे, सुनिल कबाडे व मनोज चव्हाण यांनी महोत्सवात सामिल होण्यासाठी निमंत्रित केले आहे. कलाप्रेमी रसिकांनी या संगीत महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश इंगळे, गजानन पाठक, अ.हफिज अ.रहेमान, सिताराम म्यानेवार, प्रा. पंजाब अंभोरे, मनोज चव्हाण, विशाल पतंगे, आनंद बडवणे, लक्ष्मीकांत धानोरकर, सचिन दगडू यासह सुरमणी प्रा दत्ता चौगूले सांस्कृतिक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
