रेल्वे स्टेशन परिसरातून केली होती चोरी, स्थानिक गुना शाखेची कामगिरी..
——————-
प्रतिनिधी :
——————–
वसमत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा व वसमत शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उलगडा करत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस स्टेशन वसमत शहर हद्दीत रेल्वे स्टेशन परिसरात बांधकाम व दुरुस्तीचे काम सुरू असून त्या ठिकाणी लाखो रुपयांचे बांधकाम साहित्य ठेवण्यात आले आहे. सदर साहित्याच्या सुरक्षेसाठी. २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत.
दि. ११ मार्च २०२६ रोजी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षक कांबळे हे कर्तव्यावर असताना दोन अज्ञात चोरट्यांनी बांधकाम सुरू असलेल्या साईटवर येऊन सुरक्षा रक्षका दगडफेक करीत तसेच धाक दाखवत अंदाजे ३०० किलो स्टील जबरीने चोरून नेले. या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांनी आरोपींना तात्काळ पकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे पोलीस निरीक्षक मोहन भोसलें यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस निरीक्षक शिवसांभ घेवारे यांनी समांतर तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी अजय सतपाल चव्हाण (वय ३५, रा. रेल्वे स्टेशनजवळ, देवानगर, वसमत) व दिलीपसिंग जोगनसिंग चव्हाण (रा. समीर नगर, वसमत) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ३०० किलो स्टील, किंमत सुमारे १६,२०० रुपये, जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसलें व वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शिवसांभ घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पाखळे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, नरेंद्र सावळे तसेच वसमत शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते.
अवघ्या १२ तासांत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.


