
.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात दिले मागण्यांचे निवेदन..
——————–
डॉ नागोराव जांबूतकर
——————-
मानवी हक्क अभियान संघटनेच्या वतीने गुरुवारी ता. २६ वसमत येथे धरणे आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्या मध्ये दलित आदिवासी वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या हिताच्या विविध कल्याणकारी योजना आहेत व त्याबाबत कायदेशीर तरतूद आहे. परंतु राज्य शासन व प्रशासनातील अधिकारी यांच्या उदासीन धोरणामुळे व चाल ढकलपणामुळे दलित आदिवासी वंचित घटकातील गोरगरीब जनतेला विविध शासकीय योजनेपासून वंचित रहावे लागत आहे ही बाब त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. या सर्व बाबी आपल्या निदर्शनास आणून वंचित घटकाच्या समूहातील प्रश्न सोडवण्याच्या करिता व मागण्या पूर्ण होण्याकरिता बुधवारी सामाजिक न्याय दिन छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय धरणे आंदोलन केले. तसेच विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले . तयावेळी भारत बळवंते, बी सी उबाळे , उत्तम सोनटक्के, मारुती गवारे ,वसंत सूर्यवंशी, बबन पारदे, मारुती कांबळे, दत्ता शेंडेराव, उत्तम काळे, कैलास गायकवाड, बालाजी सूर्यवंशी, बालाजी लोखंडे, प्रभाकर बनसोडे, .व सर्व समाज बांधव महिला भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .
