22972 पुरुष तर 21360 महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क…
——————–
प्रतिनिधी :
——————–
वसमत नगर परिषदेच्या निवडणुकसाठी शनिवारी ता.२० मतदान पार पडले. एकुण ५९८५५ मतदारापैकी २२९७२ पुरुष मतदारांनी तर २१३६० महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ७२ मतदान केंद्रावर एकुण मतदानाच्या ७४.०७ टक्के मतदान झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार तर सदस्य पदासाठी एकुण १५ प्रभागात ३० नगरसेवक पदासाठी १२६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. थंडीच्या कडाक्याने तुरळक मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले. दुपारची २ वाजेपर्यंत केवळ ३९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग हळू हळू वाढला. सायंकाळी ४ नंतर प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. मतदान संपले तेंव्हा २९९७२ पुरुष मतदार तर २१३६० महिला मतदार असे एकुण ४४३३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी ७४.०७ एवढी आहे.
निवडणूक विभागाने ७२ मतदान केंद्रावर ५०० मतदान अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केली होती. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकुण मतदान प्रक्रिया शांततेत पार
पडली.
रविवारी ता.२१ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकुण सहा फेऱ्यामध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. मतपेटीतून कोणाचं भाग्य उजळते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रभागानूसार मतदानाची टक्केवारी…
प्रभाग क्रमांक १ मध्ये ८३.०२ टक्के, प्रभाग क्रमांक २ मध्ये ७७.३१ टक्के, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ७८.७४ टक्के, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ७३.३७ टक्के, प्रभाग क्रमांक ५ मध्ये ७५.५८ टक्के, प्रभाग क्रमांक ६ मध्ये ७३.०१ टक्के, प्रभाग क्रमांक ७ मध्ये ७६.८९ टक्के, प्रभाग क्रमांक ८ मध्ये ८१.५२ टक्के, प्रभाग क्रमांक ९ मध्ये ७२ .४५ टक्के, प्रभाग क्रमांक १० मध्ये ६९.०७ टक्के, प्रभाग क्रमांक ११ मध्ये ६८.६८ टक्के, प्रभाग क्रमांक १२ मध्ये ७२.१० टक्के, प्रभाग क्रमांक १३ मध्ये ६९.०४ टक्के, प्रभाग क्रमांक १४ मध्ये ७४.४३ टक्के तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये ६९.७३ टक्के मतदान झाले आहे.


