
वसमत शहरालगतच्या जिरायत विभाग उघडी नदी जवळील शिवारात घडली घटना…
वसमत. ता.११ :
वसमत शहरालगतच्या जिरायत विभागाला लागून असलेल्या उघडी नदीजवळील शेतात एका तरुणाचा अज्ञातांनी चाकुने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी ता.११ दुपारी ४ च्या सुमारास उघडकीस आली. खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वनाथ राजेंद्र कदम वय २७ यांचे वसमत शहरालगत असलेल्या जिरायत विभाग उघडी नदीजवळ शेत आहे. दरम्यान रविवारी नेहमीप्रमाणे विश्वनाथ कदम हा शेतात गेला असल्याची माहिती आहे. दुपारी चार च्या सुमारास वसमत शहर पोलिस ठाण्यात जिरायत विभाग लगत उघडीजवळील शेतात एका तरुणाचा खून झाल्याची माहिती गुप्त सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक श्री महाजन व पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यानंतर सदरील मयत तरुणाचे नाव विश्वनाथ कदम वय २७ राहणार माळी गल्ली वसमत अशी ओळख पटली. मयताच्या अंगावर चाकुचे वार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला. खूनाचे कारण मात्र समजू शकले नाही. या घटनेने वसमत शहरात खळबळ उडाली आहे.
