
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,माँडेल करिअर सेंटर व बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम...
–———————
प्रतिनिधी :
———————
वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयात गुरुवार ता.२५ पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनीकडू १०० विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. मेळाव्यात पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका प्राप्त ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
जिल्हा कौशल्य विकास व रोजगार विभाग , माँडेल करिअर सेंटर व बहिर्जी स्मारक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वसमत येथे रोजगार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते . या मेळाव्यासाठी नांदेड, परभणी, हिंगोली,वसमत,पुणे, संभाजीनगर, मुंबई येथील विविध क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधीनी उपस्थिती लावली . उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. विविध पदांच्या या भरती प्रक्रियेसाठी ४०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती . मुलाखती दिलेल्या जवळपास १०० विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड झाली असुन पुढील कंपनीतील प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम निवड करण्यात येणार आहे. मेळाव्यात परिसरातील दहावी उत्तीर्ण पासुन ते पदवी , पदव्युत्तर पदवी प्राप्त तसेच आयटीआय, व पाॅलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण केलेल्या आजी/माजी विद्यार्थ्यांनी व बेरोजगार तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मेळाव्यासिठी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड मुंजाजीराव जाधव यांची तर तर प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास व रोजगार विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे , पुर्णा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री अकुसकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मा मा जाधव , संयोजक डॉ अनिल मुगुटकर , कौशल्य विकास विभागाचे श्री जांभळे , माॅडेल करिअर सेंटरचे श्री टोणपे , रमेश जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक प्रा डॉ अनिल मुगुटकर यांनी केले. उपस्थित विद्यार्थ्यांना सहाय्यक आयुक्त बालाजी मरे , प्राचार्य डॉ मा मा जाधव यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप ॲड मुंजाजीराव जाधव यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ हेमंत उंडेगावकर यांनी तर आभार ग्रंथपाल डॉ सविता अवचार यांनी मानले . या मेळाव्याला प्राध्यापक , विविध कंपनीचे व्यवस्थापक, अधिकारी , कर्मचारी , प्रतिनिधी ,विद्यार्थी , पालक , कौशल्य विकास व रोजगार विभाग हिंगोलीचे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
