
१६४ श्वानांना दिले रेबीजचे डोस, ३१ में २०२५ पर्यंत चालणार लसीकरण, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ अजय मुस्तरे यांचे आयोजन…
********
वसमत
********
येथील तालुका पशुचिकित्सालयात पशुसंवर्धन दिनानिमित्त भटक्या आणि पाळीव श्वानांना लसीकरण करण्यासाठी मंगळवारी ता.२० शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एकुण १६४ भटक्या व पाळीव श्वानांना रेबीजचे डोस देण्यात आले. सदरील रेबीज लसीकरण ३१ में ३०२५ पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सहायक आयुक्त डॉ अजय मुस्तरे यांनी दिली.
पशुसंवर्धन विभागाची स्थापना २० मे १८९२ रोजी झाली. या वर्षी विभागाच्या स्थापनेस १३३ वर्षे पूर्ण होत असून, शेतकरी पशुपालक यांना स्वयंरोजगराच्या संधी प्राप्त होवून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यात विभागाचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. विभागाच्या स्थापनेच्या वेळी घोड्यांची पैदास व जनावरांचे आरोग्य हे प्रमुख उद्दिष्ठ होते. विभागाच्या स्थापनेनंतर बरीच स्थित्यंतरे घडून जनावरांच्या आजारासबंधी उपचाराबरोबरच पशुधनाची आनुवंशिक सुधारणा करणे, जास्त दुध उत्पादन, अंडी उत्पादन, मांस, लोकर उत्पादन मिळवणे यावर भर देण्यात आला. त्या अनुषंगाने पशुसंगोपन व पशुपैदाशीची माहिती प्रशिक्षणाद्वारे पशुपालकांना देवून, रोजगार निर्मिती करुन याद्वारे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास करणे हे प्रमुख कार्य हाती घेण्यात आले.
बुधवारी
पशुसंवर्धन दिनानिमित्ताने वसमत येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयात भटक्या आणि पाळीव श्वानांना लसीकरण करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान वसमत शहरातील 164 पाळीव आणि भटके श्वानांना रेबिजची लस देण्यात आली. रेबीज आजार हा अती भयंकर आजार असून तो मानवात श्वानाणे चावा घेतल्यामुळे पसरतो. एकदा या आजाराचे लक्षणे दिसले की या आजारावर उपचार उपलब्ध नाही त्यामुळे लसिकरणाचे अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच ही लस तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय चिकित्सालयामध्ये ३१ मे २०२५ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. तालुक्यातील सर्व श्वान पालकांनी त्यांच्या श्वानाला रिबीजचे लसीकरण करून घ्यावे. आणि ही लस वर्षातून एक वेळा आपल्या श्वानाला देऊन घ्यायची असते. असे केल्यास आपल्या श्वानाला रेबीज आजार होणार नाही किंवा आपल्या श्वानापासून कुणाला चावा झाला असल्यास त्या व्यक्तीला देखील हा आजार होणार नाही.
या शिबिराचे आयोजन तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालय येथील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अजय मुस्तरे यांनी केले होते. शिबिर यशस्वी होण्यासाठी पशुवैद्यकीय चिकित्सालय येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय सावंत, पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनेपवार, श्री. राजू घाटोळ, श्री. आनंता कुरवाडे, श्री. जितेंद्र तेलगोटे, श्री. अजय मांजरमकर यांनी परिश्रम घेतले.
