स्थानिक गुन्हा शाखा व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई...
——————-
प्रतिनिधी :
——————-
चुडावा ता पुर्णा येथून वाखारी मार्गे वसमतकडे जाणारी संशयित दुचाकी शनिवारी ता.२४ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वाखारी शिवारात पोलिसांनी थांबवली असता त्यांच्याकडे पिशवीत ठेवलेला १ लाख ७८ हजार रुपयांचा ३ किलो ९०० ग्राम अवैध गांजा सापडला. दोन्ही आरोपी पुर्णा जिल्हा परभणी येथील असून त्यांच्यावर ग्रामीण पोलीसांनी एन डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हा शाखा व ग्रामीण पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
चुडावा येथून वाखारी मार्गे वसमतकडे अवैध गांजा वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुना शाखा व ग्रामीण पोलिस शनिवारी सायंकाळी वाखरी शिवारात थांबले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चुडावाकडून वाखारीकडे येत असलेली दुचाकी थांबवली. यावेळी पोलिसांनी त्यांना नाव विचारले असता त्यांनी आनंद नारायण गायकवाड वय २० वर्ष राहणार भिमनगर पुर्णा व त्याच्यामागे प्लास्टिकची पिशवी घेऊन बसलेला योगेश रमेश सूर्यवंशी वय २५ वर्ष राहणार आनंद नगर पूर्णा जिल्हा परभणी यांची अधिक चौकशी करून पिशवी तपासली असता त्यामध्ये ३ किलो ९०० ग्राम अवैध गांजा सापडला. ज्याची किंमत १ लाख ७८ हजार रुपये आहे. सदरील गांजा हा अवैधरित्या विक्री करण्यासाठी जात असताना पकडण्यात आला. दोन्ही आरोपी विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभ घेवारे, पोलीस उपनिरीक्षक श्री पातळे, गजानन पोकळे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे, भुजंग कोकरे, हरिभाऊ गुंजकर, शिवाजी जालमिरे, श्री उपरे, श्री गारोळे, श्री लोखंडे, नामदेव बेंगाळ, श्री होळपाते यांनी केली आहे.


