७३ लाखांच्या अवैध गुटख्यासह १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, पथकास १५००० रुपयांचे बक्षीस जाहीर…
——————-
नांदेड : संदिप महाजन
——————
नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने सोमवारी ता.१९ हिंगोली जिल्ह्यातील वारंवार परिसरात व नांदेड शहरातील इतवारा भागातील गोडाऊन वर छापा टाकून ७३ लाखांच्या अवैध गुटख्यासह १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नविन वर्षातील पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यावसायावर पायबंद घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आपल्या अधिनिस्त अधिकारी व अंमलदारांना एकत्रित पथक हिंगोली व नांदेड शहरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाठवले होते.
साहेब पोलीस निरीक्षक श्री तलेदवार व ५ अंमलदारांचा समावेश असलेल्या पथकाने सोमवारी सकाळी हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथे कारवाई करीत तीन चार चाकी वाहनातून १४ लाख ६७ हजार रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला. तसेच तीन चार चाकी वाहनासह १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील आरोपी करण अवचार वय २० वर्ष , प्रभाकर अवचार वय ३२ रा.भोसी तालुका कळमनुरी यांच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर सदरील पथकाने नांदेड शहरातील इतवारा भागात गुटखा साठवलेल्या एका गोडाऊन वर छापा टाकून ५८ लाख २६ हजाराचा अवैध गुटखा व २० लाख ५० हजार रुपयांचा एक ट्रक असा एकूण ७८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील गुन्ह्यात शेख जिबरान शेख मुखीद वय २६ रा. देगलूर नाका नांदेड यास ताब्यात घेऊन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही कारवाईत एकूण ७२ लाख ९३ आजारांच्या अवैध गुटख्यासह १ कोटी ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरील दोन्ही कारवाईत श्री दशरथे व श्री तलदेवार यांच्यासह श्री प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांचा समावेश होता. सदरील कामगिरी बाबत पोलीस उपमहा निरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना १५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.


