८ ठिकाणी कारवाई, १ लाख १३ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी…
——————–
प्रतिनिधी :
——————–
धुलीवंदननिमित्त अवैध दारूविक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने हिंगोली जिल्ह्यात प्रभावी कारवाई करत जिल्हाभरात एकूण ८ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे १ लाख १३ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली. धुलीवंदनाच्या दिवशी ड्राय डे असला तरी अवैध दारु विक्रीतून उत्सवात रंगाचा बेरंग होऊ नये तसेच याचा सर्वसामान्य नागरिकांना त्राह होऊ नये यासाठी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकांनी जिल्ह्यात आठ ठिकाणी ठिकाणी छापे मारुन अवैध दारू विक्रीवर लगाम लावला आहे.
यामध्ये औंढा पोलीस ठाणे हद्दीत ३ आरोपींविरुद्ध ३ गुन्हे दाखल करून ९०,३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नरसी पोलीस ठाणे हद्दीत १ आरोपीविरुद्ध १ गुन्हा दाखल करून १,११,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत १ आरोपीविरुद्ध १ गुन्हा दाखल करून २,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हिंगोली शहर पोलीस ठाणे हद्दीत १ आरोपीविरुद्ध १ गुन्हा दाखल करून ४,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीत २ आरोपींविरुद्ध २ गुन्हे दाखल करून ५,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एकुण जिल्हाभरातील आठ कारवाई मध्ये १६ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करुन १ लाख १३ हजार १९० रुपयांचा अवैध दारुचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसलें यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी धायरे, पोलीस उपनिरीक्षक माधव जिंदरे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे आदींचा समावेश होता.
धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध दारूविक्रीविरुद्ध पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


