स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी, १७ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त…
——————–
प्रतिनिधी :
——————–
हिंगोली येथील एका व्यापाऱ्याची हळद गया (बिहार) येथे पाठवण्यासाठी ट्रक मध्ये भरुन पाठवली असता तो ट्रक इतरत्र पळवून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी हिंगोलीच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ३ आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १७ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हिंगोली येथील व्यापारी संतोष राधाकिशन फक्कड यांचा हळद शेतमाल गया (बिहार) येथील माँ शक्ती ट्रेठ्डर्स येथे पाठविण्यासाठी २९ जानेवारी २०२६ रोजी ३ वाजता गोडाऊन मधून ट्रक मध्ये भरला होता. मात्र ट्रकच्या चालक आणि सदरील शेतमाल गया येथे न नेता इतरत्र पळवून फसवणूक केली होती. याबाबत संतोष भक्कड यांच्या फिर्यादीवरून हिंगोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयासंदर्भाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना यांनी सदर गुन्हयाचा तात्काळ छडा लावण्याबाबत हिंगोली गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे व त्यांचे पथक समांतर तपास करीत होते.
पोलीस पथकाने अनेक बाबींचा सखोल तपास करून गोपनिय बातमीदार व तांत्रिक बाबींचा अभ्यास केला, त्यावरून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा १) जफरूल हसन बशिर अहेमद कुरेशी वय ४० वर्ष रा. खंडूपाडा, पात्रेयाली वाल, कल्यान रोड भिवंडी ता.जि.ठाणे २) शेख जावेदअली शेख लायखअली वय ३८ वर्ष व्य. व्यापार (ट्क मालक) रा. रईसपेठ बोधन, ता. बोधन जि. निजामाबाद राज्य तेलंगणा ३) शेख अतिक शेख मोहम्मद वय ३७ वर्ष, व्य. चालक रा. सक्कूर नगर बोधन ता. बोधन जि. निजामाबाद राज्य तेलंगणा व इतर एक साथीदार यांनी संगणमत करून केला आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने आरोपी क. १ ते ०३ यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूली दिली. तसेच त्यांचेकडून गुन्हयातील मुददेमाल विकुन कमावलेले पैसे असे एकुन १७,५०,०००/- रूपयाचा मुददेमाल जप्त करून गुन्हा उघड केला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, दिलीप मोरे, पोलीस अंमलदार कोंडया मगरे, सुभाष घुगे, शेख शकील, लिंबाजी वाव्हळे, संदिप जाधव, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, शंकर हराळ, सतीष जाधव, पांडूरंग राठोड विक्की कुंदनानी व दत्ता नागरे, प्रदीप झुंगरे, इरफान पठान, मारोती काकडे प्रनीता मोरे यांनी केली आहे.


