महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम, सहशिक्षक अंबादास इंगोले यांचीही सेवापुर्ती…
———————
प्रतिनिधी :
——————–
श्री चैतन्य शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक गजानन पाठक आणि अंबादास इंगोले यांची सेवानिवृत्त झाल्यामुळे गुरुवार ता. 31 त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अँड राजकुमार माचेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अँड रामचंद्रराव बागल, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर संस्थेचे सहसचिव सुभाषराव कंधारकर, श्रीमती चंद्रकांता बाई बागल , आबासाहेब भोसले , तुकाराम खराटे , रमेश बाचनवार , मुख्याध्यापक विकास मस्के, मधुकर सोकळवार पर्यवेक्षक रामदास दुमाने, उद्धव कदम, आनंद जाधव, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती जे पी करजगीकर , सुरेश अग्रवाल बहिर्जी स्मारक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश इंगळे, मुख्याध्यापक श्री वगेवार, श्रीनिवास मस्के आदींचीची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुऊ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. यावेळी शिक्षिका संगिता देशमुख यांनी प्रास्ताविक करीत सत्कारमूर्ती गजानन पाठक व अंबादास इंगोले यांचा जीवन परिचय करुन दिला . त्यानंतर संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने गजानन पाठक व सौ गायत्री पाठक तसेच अंबादास इंगोले व त्यांची आई श्रीमती चंद्रभागाबाई इंगोले यांचा शाल श्रीफळ पुष्पहार भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी गजानन पाठक यांच्या परिवारातील अभिषेक पाठक आपल्या वडीलापती भावना व्यक्त करताना भावूक झाला तर श्वेता पाठक हिने माझ्या वडीलांनी कुटूंबाऐवढेच प्रत्येक विद्यार्थ्यावर संस्कार केले. यापुढील काळात मी वडीलांचे स्वप्न साकार करणार असल्याचे गौरवोद्गार काढूले. शिक्षक संजय माचेवार यांनी गीत सादर करुन शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना गजानन पाठक यांनी संस्थेने त्यांच्या कार्यामध्ये वेळोवेळी भरपूर सहकार्य केल्याचे सांगून आठवणींना उजाळा दिला. तर अंबादास इंगोले यांनी संस्थेच्या सहकार्यामुळे आपल्या जीवनात कायापालट झाला असे सांगितले. या वेळी अंबादास इंगोले यांचे “संवेदना”या कथासंग्रहाचे व “जगण्याच्या वाटा,”या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विकास मस्के यांनी गजानन पाठक व अंबादास इंगोले या गुणवंत कलावंत शिक्षकांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये व कलेच्या क्षेत्रामध्ये विद्यालयाला नावलौकिक मिळून दिला अशी गौरव उद्गार काढले संस्थेचे सचिव अँड रामचंद्रराव बागल यांनी या दोन्ही शिक्षकांनी संस्थेच्या विकासासाठी फार मोलाचा वाटा उचलला आणि संस्थेचे, विद्यालयाचे नाव उज्वल केले असे सांगितले . संस्थेचे अध्यक्ष अँड राजकुमार माचेवार यांनी शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वामुळे विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे भवितव्य घडत असून यात गजानन पाठक व अंबादास इंगोले यांचा फार मोठा वाटा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन विद्यालयातील शिक्षिका श्रीमती विशाखा दुधमल यांनी केले तर आभार मधुकर सोकळवार यांनी मानले. कार्यक्रमाला शहर व परिसरातील नागरिक ,शिक्षक ,प्राध्यापक , डॉक्टर, पत्रकार, विधिज्ञ यासह व गजानन पाठक व अंबादास इंगोले परिवारावर प्रेम करणारी मित्र मंडळी उपस्थित होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


