कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी; गुणवंतांचा गौरव
——————–
प्रतिनिधी :
——————-
कनिष्ठ बहिर्जी स्मारक महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेत उज्वल यश संपादन करत आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे. यंदा महाविद्यालयाचा एकूण निकाल ७६ टक्के लागला असून कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
महाविद्यालयाच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही शाखांमधील अनेक विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विज्ञान शाखेत काव्या केदार कहाळेकर हिने ८८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. विघ्नेश मेहता (८२%), वैदेही गजमल (८०.५०%), आरती बाकळे (७६.८३%), पवन कंदमवार (७५.६७%) आणि कृष्णा कंचले (७५%) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.
वाणिज्य शाखेत महानंदा पंढरी बोडखे हिने ८९.८३ टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळवले. निकिता पारसकर (८७.८३%), आरती सोळंके (८३.३५%), गायत्री पडोळे (८१.१७%) आणि रोशन कोठारी (८१%) यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
कला शाखेत तेजस गजानन सातपुते याने ८९.६७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. धनश्री कदम (८६.६७%), ऋतुजा शिंदे (७८.३३%), आरती खैरे (७८%), निकिता कदम (७७.५०%), नेहा जमरे (७६.६७%) आणि हर्षदा आगलावे (७५.४३%) यांनी यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष ॲड. मुंजाजीराव जाधव, सचिव पंडितराव देशमुख आणि कनिष्ठ महाविद्यालय समितीचे अध्यक्ष ॲड. रामचंद्रजी बागल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एम. जाधव, उपप्राचार्य डॉ. एम. बी. स्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन. एम. भोईवार, पर्यवेक्षक आर. यू. काळे, प्रबंधक डॉ. पी. बी. बर्वे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या निकालामुळे वसमत परिसरासह हिंगोली जिल्ह्यात महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


