निवडणुकांच्या तोंडावर सत्तेच्या बाजूने होत असलेल्या पक्षांतरावर व्यक्त केला खेद…
——————-
प्रतिनिधी :
——————
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावर महाविकास आघाडीला हिंगोली जिल्ह्यात गळती लागली. यावर ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर माध्यमांशी बोलतानाआपली भूमिका विशद केली. नेते गेले म्हणजे लोकं जात नसतात . आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन नविन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचा सुतोवाच केला.
येणार्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी, महायुतीमधील तसेच इतर घटकपक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक इच्छुक नेते सुरक्षिततेचा अंदाज घेत पक्षांतर करीत आहेत. यात दिग्गज नेत्यांबरोबर आजी माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात सर्वात जास्त फटका महाविकास आघाडीला बसताना दिसत आहे. सत्तेच्या दिशेने लागलेली इच्छूकांची रांग लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याची चर्चा जिल्ह्याच्या वर्तूळात होऊ लागली आहे.
यावर माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आपली भूमिका मांडताना खंत व्यक्त करीत शासनाच्या धोरणावरही संताप व्यक्त केला. पक्षातून नेते कार्यकर्ते गेल्याने पक्षाचं नुकसान झाल्याची कबुली देत ‘ नेते गेले म्हणजे लोकं जात नसता’ थोडा संघर्ष करायला हवा होता परंतू लोकही २५ ते ३० वर्षांपासून तेच ते चेहरे पाहून बदलप्रीय झाले होते. कधीकाळी नेत्यांबरोबर लोकं होती परंतु सध्याचं निवडणुकांच वास्तव आणि ग्राउंड रियालिटी पाहिली तर निवडून कसे यायलेत हेच कळत नाही. तसेच पक्षांतर केलेल्या नेत्यांबरोबर पाचशे, हजार मतदार गेले असा मी त्याचा अर्थ काढत नाही. महाराष्ट्रात आज तहाचं आणि तडजोडीचं राजकारण सुरू आहे. सत्तेत जे पक्ष आहेत त्यांच्याकडे जायचं. पुर्वी असं नव्हतं, लोकं तत्ववादी होते, लढाई वैयक्तिक नव्हती तर विचारांची होती. आज वैयक्तिक विचार सुरू झाल्यामुळे इकडून तिकडे तिकडून इकडे असा प्रकार सुरू झाला आहे. मात्र हेच लोकं सरकार बदलल की पुन्हा बदलतात. त्यामुळे आगामी निवडणुकात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना सोबत घेऊन नविन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे सांगितले.
शासनाला लक्ष करतांना श्री दांडेगावकर यांनी सध्या जनतेचे प्रश्न, मुलभूत प्रश्न, अतिवृष्टी, सुशिक्षित बेकारांचे प्रश्न यावर कोणाचें लक्ष नाही. जी मदत दिली ती अत्यंत तुटपुंजी मदत आहे.वडा फोन सारख्या कंपनीला ३२००० कोटींचा टॅक्स माफ होतो आणि शेतकऱ्यांना दोन तीन हजार कोटी दिले तर आठ आठ दिवस वर्तमानपत्रात वाजवलं जातं. हे सगळं मुळ प्रश्न बाजूला करण्यासाठी सुरु असल्याची टिका त्यांनी केली. लोकशाही पद्धतीने निवडणूक होत नाहीत ही शंका सगळ्याच मतदारांना आलेली आहे. त्यांनी दिलेलं मत हे नक्की दिलेल्या मतदारालाच गेल की अजून कोणाला गेलं यांची मोठ्या प्रमाणात चर्चा आता ग्रामीण भागात पण सुरू झाली आहे.
विकासाच्या नाही तर साधनांच्या जोरावर निवडणूका....
पुर्वी काम आणि विकासाच्या जोरावर निवडणूका जिंकल्या जायच्या.आता मात्र इतर साधनांच्या जोरावर निवडणूका जिंकल्या जात आहेत. जो उमेदवार साधनांच्या जोरावर निवडून येतो त्या उमेदवाराला पुढचे पाच वर्ष जनतेची कड राहत नसल्याचे श्री दांडेगावकर म्हणाले. महाविकास आघाडीला विधानसभेत सुध्दा लोकांनी नाकारलं नाही. महाराष्ट्रात काही विपरीत घडलं आणि हे सगळे निकाल आले. मी लढविलेल्या सहा निवडणुकापैकी सहाव्या निवडणुकीत लोकांचा सर्वात जास्त प्रतिसाद होता पण मशीनेश्वरी प्रसन्न झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. मतदार हारले नाहीत..मी हारलो नाही पण निकाल वेगळा लागला असे म्हणून त्यांनी निवडणूक विभागावरही ताशेरे ओढले.


