ग्रामीण शिक्षक प्रशांत लोखंडे यांची बोगस सिस्टीम विरुद्ध एकतर्फी झुंज…
गुत्तेदाराची मनमानी अन् प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष हे वसमत मतदारसंघाचे दुर्दैव – आंदोलक प्रशांत लोखंडे…
——————–
प्रतिनिधी :
——————–
परभणी शहराच्या दिशेने वसमत शहरात प्रवेश करतानाच बकाल रस्त्याचे प्रवाशांना दर्शन होते. कोट्यावधी चे विकासकामं असलेल्या तसेच महामार्गाचे काम सुरु असतानाच काही दिवसातच झालेली दयनीय अवस्था नागरीकांच्या जीवावर बेतत आहे. परीणामी प्रवाशासोबत अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यावर थोरावा येथील प्रशांत लोखंडे यांनी आधी भीक मागून आंदोलन व त्यानंतर आता प्रेत आंदोलन केले मात्र शासनाच्या लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही हे वसमतकरांना न उलगडणार कोड आहे. विशेष म्हणजे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदाराच्या डोक्यावर नेमका कोणाचा हात आहे हेही समजायला मार्ग नाही.
वसमत शहरातून ६१ क्रमांकाच्या महामार्ग बांधकामाचा कालावधी संपला तरी विकासकामं सुरु आहे. काम सुरु असतानाच रस्त्यावरची गिट्टी उघडी पडली असून कार मधील प्रवाशांना सुध्दा बैलगाडीत प्रवास करीत असल्याचा अनुभव येत आहे. काम पुर्ण बोगस आहेच परंतू गुत्तेदाराकडून अभियांत्रिकीचे कोणतेच निकष पुर्ण केले जात नाहीत. वसमत शहराचा चेहरामोहरा बदलणारा हा रस्ता असतानाही याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
विशेष म्हणजे याच रस्त्यावरुन महिला रुग्णालयाला रस्ता जातो . रुग्णालयात जाताना अनेक महिला रुग्णांना व त्यांच्या कुटुंबीयांसोबत अपघाताच्या घटना घडल्या. तसेच शाळकरी मुलांनाही सायकल व मोटरसायकल वरुन जाताना किरकोळ अपघात झाले. याबाबत शासन, प्रशासनाकडे नागरीकांनी अनेक तक्रारी केल्या परंतू परिस्थितीत बदल झाला नाही आणि संबंधित गुत्तेदारावरही कोणताच परिणाम झाला नाही. परिणामी थोरावा येथील खाजगी शिक्षक प्रशांत लोखंडे यांनी संबंधीत महामार्गावर भीक मागो आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधले मात्र शासन व प्रशासनाचे लक्ष वेधू शकले नाही. केवळ आंदोलकास कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक व प्रशासनाकडून रस्ता दुरुस्तीचे आश्वासन देत हातावर तूरी देण्याचे काम केले.
मात्र तब्बल दोन महिन्यानंतर रस्त्याचे काम न झाल्याने शिक्षक प्रशांत लोखंडे यांनी मंगळवारी ता.२४ महामार्गावर प्रेत आंदोलन केले. विशेष म्हणजे पोलीस विभाग सोडला तर कुठल्याही प्रशासनाच्या विभागाने आंदोलकाची साधी विचारपूस ही केली नाही.
बोगस विकासकाम हे वसमतकरांचे दुर्दैव…
वसमत शहरातून जाणारा हा महामार्ग अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असताना शासनाचे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचे अधिकारी डोळे मिटून का गप्प आहेत हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. पाटील कन्स्ट्रक्शन वरुन मायरा कन्स्ट्रक्शन असा कंपनीत बदल झाला परंतू कामाच्या दर्जात मात्र बदल झाला नाही हे वसमतकरांचे दुर्दैव असून मी शेवटच्या श्वासापर्यंत लढाउऋभणार असल्याचे शिक्षक आंलोलक प्रशांत लोखंडे यांनी सांगितले.


