समाजबांधवांची बैठक संपन्न, भव्य मिरवणूक, धर्मसभा व गुरुवर्य शिवाचार्यांचे आशिर्वचन…
——————-
प्रतिनिधी :
——————-
महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्सव साजरा करण्यासाठी सर्व पदाधिकारी व समाज बांधवांची अंतिम नियोजनाची बैठक १६ एप्रिल रोजी गवळी मारुती मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी जयंती समितीचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणारे विविध कार्यक्रमाचे नियोजन करून याप्रसंगी भव्य मिरवणूक व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
वसमत येथील गुरुवर्य श्री करबसव शिवाचार्य महाराज, गुरुवर्य श्री वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज, गुरुवर्य श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव यांची प्रमुख उपस्थिती व आशीर्वाचन लाभणार आहे. तसेच महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रा डॉ धाराशिव शिराळे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच सकाळच्या सत्रात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
जयंती उत्सव मिरवणूक मार्ग…
रविवार ता.१९ रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या जयंती उत्सवाचा मार्ग खालील प्रमाणे ठेवण्यात आला आहे .गवळी मारुती मंदिर येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक पोलीस स्टेशन, कारंजा चौक, मामा चौक, झेंडा चौक, सत्याग्रह चौक, सत्यनारायण टॉकीज मार्गे पुढे जात श्री सिद्धेश्वर मंदिर, लासिन मठ येथे संपन्न होणार आहे.
त्यानंतर सायंकाळी ६ वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथे धर्मसभा व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या विचार व तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गोविंद एजगे यांनी सर्व बसव प्रेमी व हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. या बैठकीसाठी अशोक स्वामी प्रा प्रशांत विभुते ,सुनील कबाडे, महादेव स्वामी , रंगनाथ स्वामी ,अर्जुन सैदाने , रमाकांत बल्लमखाणे , मन्मथ पुणेकर , ऋषिकेश कानबले , मुंजा परसवाळे सदानंद पिंपरणकर, मन्मथ बेले विजय मुटकुळे , सचिन कापूसकरी, हनुमंत नाईकवाडे , चिंतामणराव यशवंते, मल्लिकार्जुन नरवाडे , आळने आप्पा , महादेव एकलारे, प्रा इमडे , शिवा पत्रकार , किरण कापूसकरी ,अँड किरण कट्टेकर, संजय कळणे इत्यादी समाज बांधव उपस्थित होते


