गुरुवारी अतिश भैया दांडेगावकर यांचा हजारो समर्थकांसह भाजप प्रवेश…
—————-
प्रतिनिधी :
—————-
माजी सहकारी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र कपिश्वर शुगर प्रा.लि.चे अध्यक्ष आतिश भैया दांडेगावकर यांचा मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हजारो समर्थकांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होणार आहे. त्यासाठी वसमत विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्त्यांचा ५०० गाड्यांचा ताफा बुधवार ता.२५ मुंबई च्या दिशेने रवाना झाला आहे. आतिश भैया दांडेगावकर यांच्या भाजपा प्रवेशाने आगामी काळात वसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार हे निश्चित..

एकवेळ सहकारमंत्री व एकवेळ आमदार म्हणून वसमत विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवणारे तसेच सहकाराचा गाडा अभ्यास असलेले माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी त्यांचे सुपुत्र कपिश्वर शुगर प्रा लि चे अध्यक्ष आतिश भैया दांडेगावकर यांना भाजपा प्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिले होते. त्यानुसार आतिश भैया दांडेगावकर यांनी कार्यकर्त्यांची परवाणगी घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी भाजपा प्रवेशाचे समर्थन करीत आतिश भैया दांडेगावकर यांना एकमुखी पाठिंबा दिला होता.
कार्यकर्त्यांच्या संमतीनंतर मुंबई कोकण भवन सी बी डी बेलापुर येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यासह प्रवेश सोहळा करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार बुधवारी सकाळी जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर गाड्यांचा ताफा जमा झाला. संपुर्ण वसमत मतदारसंघातून जवळपास ५ हजार कार्यकर्ते प्रवेश सोहळ्याला जाण्यासाठी एकत्र जमले. सकाळी १० वाजता तब्बल ५०० गाड्यांचा ताफा मुंबई च्या दिशेने निघाल्या.तत्पूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वरुढ पुतळा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर प्रवासाला सुरुवात केली.
दरम्यान, आतिश भैया दांडेगावकर यांच्या प्रवेशानंतर वसमत मतदारसंघात भाजपाचे बळ वाढणार असून आगामी काळात राजकीय गणिते बदलण्याचे संकेत या प्रवेशातून मिळत आहेत.


