बहिर्जी महाविद्यालयाचे नाव उज्वल, महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेत अव्वल…
——————-
साईनाथ पतंगे
—————–
वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सानिका सुभाष मगर हिने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन, नवी दिल्ली तसेच इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको नवी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रस्तरीय निबंध स्पर्धेत सानिकाने द्वितीय क्रमांक पटकावला.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त देशभरातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सानिकाने आपल्या उत्कृष्ट लेखन कौशल्याच्या जोरावर परीक्षकांची मने जिंकत हे यश मिळवले.
सानिकाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच सहविद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सांस्कृतिक कक्ष आणि महाविद्यालय प्रशासनाच्या वतीनेही तिचे कौतुक करण्यात आले आहे.


