कलशधारी महिलासह, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ व राम लक्ष्मण सीता बजरंगबली यांच्या जिवंत देखाव्याने शोभायात्रेत उत्साह…
———————
प्रतिनिधी :
———————
जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणे वसमत येथे गुरुवारी ता.१९ हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत कलशधारी महिला देव देवतासह महापुरुषांचे जिवंत देखावे नागरिकांचे आकर्षण ठरले.


जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संप्रदायाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमासह विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. धर्म, संस्कृती व परंपरेचे जतन करण्याबरोबरच भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्देशाने वसमत येथे हिंदू नववर्ष व गुढीपाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन केले गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेस सुरुवात झाली. या शोभायात्रेत असंख्य कलसधारी महिलांसह भगवे झेंडे हातात घेतलेले असंख्य नागरिक सहभागी होते. तसेच या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ जिवंत देखावा व राम लक्ष्मण सीता बजरंग बली यांचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. सदरील शोभायात्रा मामा चौक ,झेंडा चौक, गवळी मारुती मंदिर , विद्यानगर मार्गे वेंकटेश्वरा मंगल कार्यालयात पोहोचली. दरम्यान या शोभायात्रेचे नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.



व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी आमदार राजू भैया नवघरे, कपिश्वर शुगर फॅक्ट्रीचे अध्यक्ष आतिश भैया दांडेगावकर, डॉ अजय मुंदडा, नगराध्यक्ष प्रतिनिधी कन्हैया बाहेती, काशिनाथ भोसले, आदित्य देशपांडे आदींची उपस्थिती होती. यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून गरजू गरीब विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाच सायकलीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता हिंदू परंपरेप्रमाणे पुरणपोळी स्नेहभोजनाने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी संप्रदाय, सर्व पदाधिकारी व हिंगोली जिल्हा सेवा समितीच्या भक्त मंडळींनी पुढाकार घेतला.



