हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेची कामगिरी, सिरळी शिवारात केली होती बेकायदेशीर लागवड, कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
——————–
प्रतिनिधी :
——————-
हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने बेकायदेशीर अफू लागवडीचा सोमवार ता.१६ पर्दाफाश केला असून तब्बल चार गुंठे क्षेत्र असलेल्या लागवडीवर छापा टाकून १ क्विंटल ७७ किलो अफू झाडास ३ लाख ५४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही वसमत तालुक्यातील सिरळी शिवारात केली आहे. बेकायदेशीर अफू वरील ही हिंगोली जिल्ह्यातील आजपर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही ठरली आहे.
हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना मिळालेल्या गोपणीय माहिती नुसार वसमत तालुक्यातील सिरळी शिवारात एका शेतामध्ये अवैधरित्या अफुची लागवड केली असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने सिरळी शेत शिवारात छापा मारला. सदर ठिकाणी प्रताप सुरेश नलगे रा. सिरळी ता. वसमत जि. हिंगोली यांच्या ताब्यातील अंदाजे ०४ गुंठे शेतीमध्ये लसणाच्या पिकात बेकायदेशीर अफु लागवड केल्याचे मिळुण आले. शेतमालक प्रताप नलगे यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदर अफुची झाडे विकी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे लागवड केल्याचे सांगीतले. सदर अफुचे बोंडे, फुले असलेले झाडाचे राजपत्रीत अधिकारी व पंचासमक्ष वजन केले असता त्याचे वजन ०१ क्विंटल ७७ किलो ४५ ग्रॅम किंमती अदांजे ३,५४,९००/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने कायदेशीररीत्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पथकाच्या मदतीने सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन शेत मालक प्रताप नलगे वय ४२, व्य. शेती रा.सिरळी ता. वसमत जि. हिंगोली यास ताब्यात घेवुन त्यांच्या विरूध्द पोलीस स्टेशन कुरूंदा गुरनं ५६/२०२६ कलम ८ (क), १८ एनडीपीएस कायदान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांव घेवारे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पाकळे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, साईनाथ कंठे, किशोर सावंत तसेच पोस्टे कुरूंदाचे पोउपनि श्री कारामुंगे, संदीप टाक, साठे यांच्या पथकाने केली आहे.


